नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असणार याविषयी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. या अध्यक्षपदाविषयी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले असून, एका गटाला गांधी घराण्याचाच तर दुसऱ्या गटाला गांधी घराण्याशिवाय अध्यक्ष हवा आहे. दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी वरिष्ठ नेते शशी थरुर मैदानात उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण असणार याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. वरिष्ठ नेते शशी थरुर अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. याबाबत त्यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र लवकरच ते निर्णय घेऊ शकतात. थरुर यांनी मात्र याबाबत अद्याप काहीच मत व्यक्त केलेले नाही. त्यांनी दैनिक मातृभूमीमध्ये मल्याळम भाषेत लेख लिहिला असून, काँग्रेस पक्षातील मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीचे आवाहन केले आहे.
पक्षाने काँग्रेस कार्यकारिणीच्या डझनभर जागांसाठीही निवडणुका जाहीर केल्या पाहिजे असेही त्यांनी म्हणले आहे. एआयसीसी आणि पीसीसी प्रतिनिधींमधून या महत्त्वाच्या पदांवर पक्षाचे नेतृत्व कोण करणार हे पक्षाच्या सदस्यांना ठरवू द्या, या नेत्यांना पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी विश्वासार्ह जनादेश देण्यास मदत होईल, असे ते म्हणाले आहेत.
काँग्रेसची परिस्थिती गेल्या काही दिवसात फारशी बरी नाही. त्यामुळे पक्षाला पूर्णपणे पुनरुज्जीवित करण्यासाठी नेतृत्वाची जागा तातडीने भरणे गरजेचे आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे आता पूर्णवेळ अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शशी थरूर यांचा 23 नेत्यांच्या गटात समावेश करण्यात आला आहे ज्यांनी 2020 मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना संघटनात्मक सुधारणांची मागणी करणारे पत्र लिहिले होते. तिरुअनंतपुरमचे खासदार म्हणाले, “नवीन अध्यक्षाची निवड ही काँग्रेसला नितांत गरज असलेल्या पुनरुज्जीवनाची सुरुवात आहे. निवडणुकीसाठी अनेक उमेदवार पुढे येतील अशी माझी अपेक्षा आहे. पक्ष आणि देशासाठी आपले विचार मांडले तर जनहित नक्कीच जागृत होईल. पक्षाचे पूर्ण पुनरुज्जीवन होणे गरजेचे असले तरी नेतृत्वाचे जे पद ताबडतोब भरले जाणे आवश्यक आहे ते साहजिकच काँग्रेसचे अध्यक्षपद आहे.
काँग्रेसच्या नूतन अध्यक्षाच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार 24 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. नामांकनाची अंतिम तारीख ३० सप्टेंबर असेल. सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 1 ऑक्टोबरला होणार असून, 8 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
https://twitter.com/BhavBrahma/status/1564499653638631424?t=MB4GmbQnjDsEHKRPyhdezg&s=19
Congress Leader Shashi Tharoor President Election
Politics Indication Trumpet