इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर लवकरच पक्ष सोडू शकतात. याबाबतही अटकळ बांधली जात आहे की ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे केरळ अध्यक्ष पीसी चाको यांनीही याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता पुढील काळात काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे केरळ अध्यक्ष पीसी चाको म्हणाले की, “काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू.” काँग्रेस पक्षाने त्यांची हकालपट्टी केली तरी ते तिरुअनंतपुरमचे खासदार राहतील. काँग्रेसकडून थरूर यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे, याची मात्र मला कल्पना नाही.
काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यापासून शशी थरूर यांच्याकडे पक्षात दुर्लक्ष होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाल्यानंतर थरूर यांना मोठ्या भूमिकांपासून दूर ठेवले जात आहे. त्यामुळे थरूर नाराज झाले आहेत. थरूर यांनीही अध्यक्ष पदासाठी अर्ज भरला होता. मात्र, ते खर्गे यांच्याकडून मोठ्या फरकाने पराभूत झाले. यानंतर त्यांना काँग्रेसच्या उच्चस्तरीय समित्यांमध्येही स्थान मिळाले नाही.
थरुर म्हणाले…
दरम्यान, शशी थरूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. पीसी चाको यांच्या वक्तव्यानंतर थरूर यांनी मी राष्ट्रवादीत जात नसल्याचे म्हटले आहे. याबाबत मी पीसी चाको यांच्याशी चर्चाही केलेली नाही. याआधी थरूर यांनीही नाराजीच्या बातम्यांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वी त्यांनी पक्षातील कोणाच्याही विरोधात बोलले नाही किंवा सूचनांविरुद्ध काम केले नाही, असे सांगितले होते. असे कोणाला वाटत असेल तर पुरावा सादर करा. असा वाद का निर्माण झाला? मी कोणावरही आरोप केलेले नाहीत. माझ्याकडून कोणतीही तक्रार किंवा समस्या नाही. मला सगळ्यांना एकत्र पाहण्यात काही अडचण येत नाही किंवा मला कोणाशीही बोलण्यात अडचण येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Congress Leader Shashi Tharoor NCP Join Politics