इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारत जोडो यात्रा करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टी शर्टची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या महागड्या टी – शर्टवर निशाणा भारतीय जनता पक्षाने साधला असून, राहुल गांधीवर टिकास्त्र सोडले आहे. राहुल यांचा टी शर्ट तब्बल ४१ हजार रुपये किंमतीचा आहे. एवढे महागडे कपडे घालून राहुल हे पदयात्रा करीत असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे.
राजकीय मैदान मजबूत करायचे असेल तर आता रस्त्यावर उतरावे लागेल, याची जाणीव आत केंद्रातील सत्तेपासून सलग आठ वर्षे दूर राहिल्यानंतर काँग्रेसला झाली आहे. त्यामुळे पक्ष ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो यात्रे’वर आहे. काँग्रेस याला व्यापक जनसंपर्क अभियान म्हणत आहे. हा प्रवास एकूण ३५७० किलोमीटरचा आहे. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची वेगळी शैली पाहायला मिळाली. कुर्ता पायजमामध्ये दिसणारे राहुल त्याऐवजी टी – शर्ट आणि पँटमध्ये दिसले. पण लोकांचे लक्ष त्यांच्या बुटांकडे होते. त्यानंतर सगळ्यांना बुटांची किंमत कळू लागली. आता भाजपाने त्यांच्या टी – शर्टची किंमत सांगून नवा वाद सुरू केला आहे.
भारतीय जनता पक्षाने आपल्या ट्विटर हँडलवरून राहुल गांधींचा टी-शर्ट घातलेला एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये माजी काँग्रेस अध्यक्षांनी घातलेल्या टी – शर्टची किंमत कोणत्या कंपनीची आहे, हे सांगण्यात आले आहे. या पोस्टनुसार, राहुल गांधी यांनी ब्रिटिश लक्झरी फॅशन ब्रँड बर्बेरीचा पोलो टी-शर्ट घातला आहे, ज्याची किंमत ४१ हजार २५७ रुपये आहे. यासोबतच भाजपाने टोमणा मारत लिहिलं आहे की, भारताकडे बघा! आता या पोस्टवरून नवा वाद सुरू झाला आहे. अनेकजणांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे महागड्या कपडे, राहणीमानावरदेखील चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.
भाजपच्या टीकेला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बघा, ते काय म्हणत आहेत…
https://twitter.com/Araav052/status/1568189560332644353?s=20&t=PZokui1s5kONkZM8jXEAlg
Congress Leader Rahul Gandhi T Shirt Controversy
Bharat Jodo Yatra Branded Shirt BJP Allegation Politics