इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण, सुरत न्यायालयाने त्यांना आज २ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 2019 मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेच्या प्रकरणी सुरत न्यायालयाने आज हा निकाल दिला आहे. न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आहे. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयाने राहुल यांना जामीनही मंजूर केला आहे.
मोदी आडनावावर टिप्पणी केल्याबद्दल राहुल यांच्यावर गुन्हेगारी मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आजच निर्णय अपेक्षित होता. हे पाहता राहुल गुरुवारी सकाळीच सुरतला रवाना झाले. राहुल गांधी यांचे आगमन पाहण्यासाठी गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश ठाकोर, पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अमित चावडा, एआयसीसी गुजरातचे प्रभारी रघु शर्मा आणि आमदारांसह अनेक वरिष्ठ काँग्रेस नेते सुरतमध्ये उपस्थित आहेत. याआधी, राहुल गांधी यांचे वकील किरीट पानवाला यांनी सांगितले होते की, निकाल सुनावताना काँग्रेस नेतेही उपस्थित राहणार आहेत.
BREAKING: Rahul Gandhi SENTENCED to Two Years in jail. #DefamationCase https://t.co/ylUxotXag4
— Live Law (@LiveLawIndia) March 23, 2023
2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे आहे? या संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. वायनाडचे लोकसभा सदस्य राहुल यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे झालेल्या एका जाहीर सभेत या प्रकरणाशी संबंधित टिप्पणी केली होती.
मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गेल्या शुक्रवारी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर निकालासाठी २३ मार्चची तारीख निश्चित केली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान राहुल तीनदा कोर्टात हजर झाले. ऑक्टोबर 2021 मध्ये, आपले म्हणणे नोंदवण्यासाठी कोर्टात पोहोचलेल्या राहुल यांनी स्वतःला निर्दोष घोषित केले होते.
#WATCH | Congress MP Rahul Gandhi reaches Delhi airport.
Rahul Gandhi to visit Surat today as Surat District Court is likely to pass an order in a criminal defamation case against him over his alleged 'Modi surname' remark. pic.twitter.com/aoaJwr0k4D
— ANI (@ANI) March 23, 2023
Congress Leader Rahul Gandhi Surat Court order 2 Year Jail