नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासदारकी रद्द झाल्यानंतर प्रथमच जाहीररित्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी थेट भाजपच्या सर्व नेत्यांनाचा आव्हान केले आहे. अदानी यांच्या कंपनीतील २० हजार कोटी कुणाचे आहेत, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे चॅलेंज त्यांनी भाजपला केले आहे. त्यांच्या या आव्हानाने पुन्हा एकदा मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांच्या चर्चांना उत आला आहे.
‘अदानी यांच्या शेल कंपनीत २० हजार कोटी कोणी गुंतवले? तो पैसा कोणाचा आहे? अदानी आणि मोदींचं नात नवीन नाही. मी मुद्देसुदपणे संसदेत अदानीवरून प्रश्न उपस्थित केले होते. त्यासाठी संदर्भही दिले होते. तरीही भाजपच्या मंत्र्यांनी माझ्याबाबतीत चुकीची माहिती दिली. संसदेत माझ्याबाबतीत खोटे आरोप करण्यात आले. मला प्रश्न विचारू दिले नाहीत. मात्र, प्रश्न विचारणे बंद करणार नाही. माझा तो इतिहास नाही. मी देशाच्या लोकशाहीसाठी लढतोय, घाबरत नाही. अदानी यांच्या कंपनीत २० हजार कोटी कोणी गुंतवले? त्यामध्ये चीनमधील व्यक्तीचाही सहभाग आहे. खासदारकी रद्द करून मला गप्प करू शकत नाही. अदानीच्या शेल कंपनीत कोणी गुंतवणूक केली हा माझा प्रश्न आहे. मला प्रश्न का विचारू दिले जात नाहीत असे विचारले असता लोकसभा सभापती म्हणतात चला एक चहा घेऊ म्हणतात.’
https://twitter.com/RahulGandhi/status/1639550324472987649?s=20
माझ्या भाषणांना घाबरले
माझ्या पुढच्या भाषणाची पंतप्रधानांना भीती वाटल्याने मला अपात्र ठरवण्यात आले. मी संसदेत आहे की बाहेर मला काही फरक पडत नाही. मला माझी तपश्चर्या करायची आहे, ते करून दाखवीन. मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही. नरेंद्र मोदींशी अदानी यांचा काय संबंध? मी या लोकांना घाबरत नाही. जर त्यांना वाटत असेल की माझे सदस्यत्व रद्द करून, धमकावून, मला तुरुंगात पाठवून ते मला बंद करू शकतात. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहीन, असे राहुल गांधी म्हणाले.
https://twitter.com/RahulGandhi/status/1639529994811523073?s=20
Congress Leader Rahul Gandhi Press Conference Questions to BJP