इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या परदेश दौऱ्यावर असून त्यांचा नाईट क्लबमधील व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. भाजप नेत्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, राहुल गांधी हे एका तरुणीसोबत नाईट क्लबमध्ये आहेत. या व्हिडिओवरुन भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. या व्हायरल व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रीया सोशल मिडीयात दिसून येत आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेपाळची राजधानी काठमांडू दौऱ्यावर असल्याचे सांगितले जाते. तेथे मैत्रिणीच्या विवाह सोहळ्याला ते उपस्थित राहण्यासाठी गेल्याचे काँग्रेसच्यावतीने सांगण्यात येत आहे. काठमांडू येथील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुमनिमा उदास ही राहुल गांधी यांची मैत्रिण आहे. ती एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेची पत्रकार आहे. सुमानिमाचे वडिल हे राजदूत म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. सुमानिमाच्या विवाह सोहळ्याला नेपाळसह भारतातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित असल्याचे सांगितले जाते.
भाजप नेते अमित मालविय यांनी ट्विट केलेला राहुल गांधींचा व्हिडिओ असा
https://twitter.com/amitmalviya/status/1521362563727986689?s=20&t=d42uVEy8DU3pZT2wL0ulwQ
दरम्यान, राहुल यांचा नाईट क्लबमधील व्हिडिओ सध्या सोशल मिडियात चर्चेचा विषय बनला आहे. काहींच्या मते राहुल यांच्या सोबत असलेली तरुणी ही चीनची नेपाळमधील राजदूत आहे. काहींचे म्हणणे आहे की, राहुल आणि ती तरुणी हे दोघेही कॉलेजमध्ये सोबत होते. तर, काहींच्या मते ती नेपाळी तरुणी आहे.
भाजप नेते मालविय यांनी म्हटले आहे की, मुंबईत त्यांचा पक्ष अडचणीत असताना राहुल हे नाईट क्लबमध्ये आनंद घेताना दिसत आहेत. तर, याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, राहुल हे खासगी विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नेपाळला गेले. एखाद्या लग्न समारंभात सहभागी होणे हे आपल्या भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे.
https://twitter.com/ANI/status/1521383800810344448?s=20&t=8X8QRQUyoVyUAs2iCPqsLw
दरम्यान, इतरांच्या खासगी जिवनात भाजप का नाक खुपसते असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे. तर, राहुल हे कधी गंभीर होते. त्यांची जीवनशैली ही अशीच आहे, असेही काहींनी म्हटले आहे.