नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा खासदार झाले आहेत. लोकसभा सचिवालयाने आज सकाळी एक अधिसूचना जारी करून राहुल गांधी यांना खासदारकी बहाल केली आहे. मार्च २०२३ मध्ये मोदी आडनाव प्रकरणात त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आणि संसदेतून अपात्र ठरवण्यात आले. मात्र, ४ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता लोकसभा सचिवालयाने ही अधिसूचना काढली आहे.
‘मोदी आडनाव’ टिप्पणीवरून गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तात्काळ दिलासा मिळाला. न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम आदेश देत काँग्रेस नेत्याच्या शिक्षेला तूर्त स्थगिती दिली. तत्पूर्वी, गुजरात उच्च न्यायालयाने त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीवरून मानहानीच्या खटल्यात त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत मोठी बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल यांना मिळालेला दिलासा तात्काळ आहे. न्यायालयाने खटला फेटाळलेला नाही, मात्र शिक्षेला स्थगिती दिली आहे. आता या प्रकरणी नव्याने सुनावणी होणार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली तर राहुल यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले जाईल. त्याचबरोबर न्यायालयाने निर्दोष सोडल्यास किंवा दोन वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाल्यास राहुल निवडणूक लढवू शकतील. मात्र, हा निर्णय कधी येतो, हे पाहावे लागेल. २०२४ च्या निवडणुकीनंतर न्यायालयाचा निर्णय येईल असेही होऊ शकते. अशा स्थितीत राहुल २०२४ ची निवडणूक लढवू शकतात.
Congress Leader Rahul Gandhi MP Loksabha Secretariat