नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदनामी केल्याच्या एका खटल्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे एक हजार रुपयांचा दंड जमा करावा, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राजेश कुंटे यांना आदेश दिला आहे. तक्रारदार कुंटे यांनी स्थगिती अर्ज सादर केल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
दिल्लीतील आणखी एका नोटरी साक्षीदाराला हजर करण्याची तक्रारदाराची विनंती फेटाळल्यानंतर न्यायालयाने मार्चमध्ये सुनावणी स्थगित केली होती. कुंटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दररोज सुनावाणी सुरू होणार होती. परंतु गुरुवारी दुसऱ्यांदा सुनावणी स्थगित करण्यात आली आणि न्यायालयाने तक्रारदाराला दंड भरण्याचे आदेश दिले.
बचाव पक्षाचे वकील नारायण अय्यर म्हणाले, की तक्रारदाराने सुनावणी पुन्हा स्थगित करण्याची विनंती केली, परंतु न्यायालयाने अर्ज फेटाळत एक हजार रुपयांचा दंड करण्याचे आदेश दिले. तसेच १० मे रोजी पुढील सुनावणीची तारीख निश्चित करून पुरावे आणि साक्षीदार हजर करण्याचे आदेशही दिले.
राहुल गांधी यांनी २०१४ रोजी आपल्या एका भाषणात महात्मा गांधी यांच्या मृत्यूसाठी आरएसएस जबाबादार आहे, असा आरोप केला होता. त्यानंतर भिवंडी न्यायालयात त्यांच्याविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने २०१८ मध्ये राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोप निश्चित केले होते. आता न्यायालयाच्या आदेशान्वये काँग्रेस नेते राहुल गांधी यांना १ हजार रुपये कुंटे यांना द्यावे लागणार आहेत.