इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी १३ एप्रिल रोजी होणार आहे. मोदी आडनावाच्या बदनामी प्रकरणात खालच्या न्यायालयाने राहुल यांना २ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याविरोधात आज राहुल यांनी सत्र न्यायालयात अपिल दाखल केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सुरतमध्ये आज पोहोचले. त्यांच्या समर्थनार्थ तीन राज्यांचे मुख्यमंत्रीही सोबत होते. यामध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांचा समावेश आहे.
याशिवाय पक्षातील अनेक दिग्गज नेते राहुल यांच्या समर्थनार्थ सुरतला पोहोचले. मानहानीच्या खटल्यातील दोषींच्या विरोधात अपील दाखल केल्यानंतर राहुल गांधी सुरत जिल्हा न्यायालयातून बाहे पडले. ‘मोदी आडनाव’ संबंधित बदनामी प्रकरणात न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सुरतमध्ये याचिका दाखल केली.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1642825335808090115?s=20
Congress Leader Rahul Gandhi Bail Surat Court