नवी दिल्ली – काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वड्रा यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. लखीमपुरी खिरी येथे शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याच आंदोलनस्थळाला भेट देण्यासाठी प्रियंका गांधी जात होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले आणि स्थानबद्ध केले आहे. अखेर गांधी यांनी त्या घरातूनच आपल्या उपोषणाला प्रारंभ केला आहे. सर्वप्रथम त्यांनी घराची खोली स्वतःच झाडूने स्वच्छ केली. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. महात्मा गांधींच्या विचारानुसार श्रमदान करुन गांधी यांनी उपोषणाला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/srinivasiyc/status/1444914387689431041