नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रियंका गांधी वाड्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. त्या स्वतः विलगीकरणात आहेत. कोरोना विषाणूची पुन्हा लागण झाल्याची माहिती प्रियंका गांधी यांनी ट्विट करून दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘आज पुन्हा एकदा कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मी घरी एकांतात आहे आणि संपूर्ण प्रोटोकॉल पाळला जात आहे. दरम्यान, एवढेच नाही तर राहुल गांधी यांची प्रकृतीही बिघडली असून त्यामुळे त्यांनी राजस्थानमधील अलवरचा दौरा रद्द केला आहे. राहुल गांधी आज अलवरमध्ये काँग्रेस नेतृत्वाच्या संकल्प शिबिरात सहभागी होणार होते.
पक्षात नवे नेतृत्व विकसित व्हावे आणि कार्यकर्त्यांचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी काँग्रेसकडून सर्व राज्यांमध्ये शिबिरे आयोजित केली जात आहेत. राजस्थानमध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत पक्ष विशेषत: या राज्यात सक्रिय आहे. मे महिन्यात काँग्रेसचे चिंतन शिबिरही उदयपूर, राजस्थान येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात या वर्षी सप्टेंबरपर्यंत अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले. याशिवाय काँग्रेसच्या संघटनेत मागास, दलित आणि अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.
याआधी जूनमध्येही प्रियंका गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतरही प्रियंका गांधी यांनी ट्विट करून स्वतःला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. प्रियांका गांधी यांनी सांगितले होते की, त्यांच्यामध्ये कोरोनाची किरकोळ लक्षणे आढळून आली आहेत. त्यानंतरही प्रियंका गांधी यांनी स्वत:ला घरातच वेगळे केले होते.
https://twitter.com/priyankagandhi/status/1557205603264921600?s=20&t=_hfv5j-BEIDdGHrS2nfotA
Congress Leader Priyanka Gandhi again Corona Infected