इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना त्यांच्याच पक्षाच्या समर्थक वकिलांच्या विरोधाचा आज सामना करावा लागला. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आवारात आज हायव्होल्टेज ड्रामा रंगला. त्यामुळेच त्याची देशभरात चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, संतापलेले कार्यकर्ते चिदंबरम यांना म्हणाले की, ‘आम्ही तुमच्यावर थुंकतो. तुम्ही तृणमूल काँग्रेस (टीएमसी)चे एजंट झाला आहात. कार्यकर्त्यांचा रोष पत्करतच चिदंबरम यांना न्यायालयात प्रवेश करावा लागला.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेला विरोध करण्यासाठी चिदंबरम हे आज कोलकाता उच्च न्यायालयात पोहोचले होते. चौधरी हे सध्या पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रभारी आहेत आणि लोकसभेचे खासदारही आहेत. चौधरी यांनी 2018 मध्ये ममता बॅनर्जींविरोधात भ्रष्टाचाराचा आरोप करत याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली होती. हे प्रकरण पश्चिम बंगालच्या मेट्रो डेअरीचे ४७ टक्के समभाग Kventor Agro Limited ला विकण्याशी संबंधित आहे. शेअर्स खरेदी केल्यानंतर कंपनीने 15 टक्के शेअर्स थेट सिंगापूर कंपनीला हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. 2011 पासून ममता बॅनर्जी सरकारने केलेली ही एकमेव निर्गुंतवणूक आहे.
Kventor Agro Ltdचे वकीलपत्र चिदंबरम यांनी घेतले आहे. त्यामुळेच ते न्यायालयात पोहोचले होते. अधीर रंजन यांची जनहित याचिका रद्द करण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. ते न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडू लागले तेव्हा वकिलांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. वकिलांनी त्यांना घेरावही घातला आणि तो टीएमसीचा एजंट असल्याचेही सांगितले जाते.
वकील आणि काँग्रेस नेते कौस्तव बागची हे संतापून चिदंबरम यांच्यावर ओरडले. ते म्हणाले की, आम्ही तुमच्यावर थुंकतो. तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते अत्याचाराविरुद्ध लढत असताना तुम्ही टीएमसीचे एजंट राहता. तुम्ही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जनहित याचिकाला विरोध करत आहात. चिदंबरम परत जा. काँग्रेसची एक महिला कार्यकर्ताही यावेळी ‘परत जा’ असं सतत ओरडत होती. तिने चिदंबरम यांच्यासमोर तिचा काळा कोटही भिरकावला
#Watch| Congress leader P Chidambaram chased away by Congress legal cell lawyers at Calcutta HC today. Chidambaram had reached the court to represent the West Bengal government in the Metro Dairy case against West Bengal Pradesh Congress President Adhir Ranjan Chowdhury. pic.twitter.com/deRC6T7KrG
— Pooja Mehta (@pooja_news) May 4, 2022