इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटकात काँग्रेसच्या विजयात खऱ्या अर्थाने चेंजमेकरची भूमिका डीके शिवकुमार यांनी बजावली आहे. त्यांच्या चाणक्यनीतीने कर्नाटकातून भाजपचा सुपडा साफ झाला आहे.
काँग्रेसच्या विजयानंतर सर्वाधिक चर्चा डीके शिवकुमार यांची आहे. विद्यमान कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आता मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार असलेले डी. के. शिवकुमार. त्यांच्यासह राज्यातील नेत्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आज कर्नाटक निकालामध्ये दिसून आलं आहे. शिवकुमार यांचे कौशल्याचे, राजकीय व्यवस्थापन तसेच संकटमोचक म्हणून असलेली प्रतिमा कर्नाटक निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध झाली आहे. कर्नाटक काँग्रेसमधील ते शक्तीशाली नेते असून अत्यंत श्रीमंत राजकारणी सुद्धा समजले जातात. पक्ष जेव्हा जेव्हा संकटात असेल तेव्हा तेव्हा त्यांनी धावत जात संकटाचा सामना अगदी नेटाने केला आहे.
राहुल, सोनियांचे विश्वासू
दिवंगत विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रिपदाच्या काळात २००२ मध्ये अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी देशमुखांनी डीके शिवकुमार यांच्याच संपर्कात होते. तेव्हा डीके शिवकुमार यांनी मतदानाच्या तारखेपर्यंत एक आठवडा महाराष्ट्रातील आमदारांना बंगळुरू बाहेरील भागात असलेल्या त्यांच्या रिसॉर्टमध्ये ठेवले होते. त्यामुळे देशमुखांचे सरकार वाचले होते. तसेच अहमद पटेलांची खासदारकीदेखील शिवकुमार यांनी वाचवली आहे. २०१८ च्या निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्या आघाडी सरकारच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचे श्रेय त्यांनाच जाते. ते पक्षाचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचेही जवळचे विश्वासू आहेत.
श्रीमंत राजकारण्यांपैकी एक
शिवकुमार हे भारतातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक आहेत. २०१८ च्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करताना त्यांनी ८४० कोटींची एकूण संपत्ती जाहीर केली होती. २ जुलै २०२० रोजी डीके शिवकुमार यांनी अधिकृतपणे दिनेश गुंडू राव यांच्यानंतर कर्नाटक प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.
My Team ?#KarnatakaElectionResults2023 pic.twitter.com/gj0DX8C0TV
— DK Shivakumar (@DKShivakumar) May 13, 2023
Congress Leader DK Shivkumar Changemaker