नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कनार्टकातील काँग्रेसच्या विजयामध्ये त्यांनी दिलेल्या पाच वचनांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. या पाच वचनांमध्ये कर्नाटकातील सर्व महिलांना मोफत बस प्रवास, घरातील महिला प्रमुखाला दर महिन्याला २ हजार रुपये या घोषणांचा समावेश आहे. पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही या ५ आश्वसनांची पूर्ती करण्यासाठी मंजुरी देऊ, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहीर केले आहे.
कनार्टकमधील विजयाने काँग्रेसमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. या एकहाती विजयामागे काँग्रेसने दिलेल्या पाच घोषणांचा समावेश आहे. यानुसार गृहलक्ष्मी योलनेंतर्गत घरातील महिला प्रमुखाला दर महिन्याला २ हजार रुपये देण्यात येणार आहे. युवानिधी अंतर्गत कर्नाटकातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. यानुसार दोन वर्षांसाठी कर्नाटकातील बेरोजगार पदवीधारकांना ३ हजार रुपये प्रति महिना आणि बेरोजगार डिप्लोमाधारकांना १५०० रुपये प्रति महिना जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, काँग्रेसने २ लाख सरकारी नोकऱ्या आणि १० लाख खासगी नोकऱ्या निर्माण करण्याचेही आश्वासन दिले आहे. अन्नभाग्य या योजनेनुसार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दर महिन्याला प्रति व्यक्ती १० किलो तांदूळ दिले जाईल. गृह ज्योती योजनेंतर्गत कर्नाटकातील प्रत्येक कुटुंबाला २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येईल. तर सखी योजनेनुसार कर्नाटकातील सर्व महिलांना मोफत बस प्रवासाचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे. या पाच आश्वासनांमुळे कर्नाटकातील जनेतेने विश्वास टाकल्याचे बोलण्यात येत आहे.
मल्लिकार्जुन खर्गे ठरले लकी
काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पक्षासाठी लकी ठरले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारून काही महिने लोटत नाही तोच त्यांनी काँग्रेसला कर्नाटकात मोठा विजय मिळवून दिला आहे. याबद्दल खर्गे यांनी जनतेचे आभार मानले आहेत. ते म्हणाले,‘हा खरोखर कर्नाटकातील जनतेचा विजय आहे. त्यांनी त्यांच्या प्रगतीशील भविष्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी मतदान केले आहे. आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही हात जोडून त्यांचे आभार मानतो. काँग्रेस पक्ष पाचही आश्वासनांची अंमलबजावणी करणार आहे. जय कर्नाटक! जय हिंद!’
कर्नाटक का वोट…
5 गारंटी के लिए,
महिलाओं के अधिकार के लिए,
युवाओं के रोज़गार के लिए,
गरीबों के उत्थान के लिए।आएं, ज़्यादा से ज़्यादा संख्या में मतदान करें,
‘40% कमीशन’ मुक्त, प्रगतिशील कर्नाटक का साथ में निर्माण करें।#CongressWinning150 pic.twitter.com/3ycwYtabcN— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 10, 2023
Congress Karnataka First Cabinet Meet 5 Decisions