नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोविडशी संबंधित समस्यांमुळे त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ७५ वर्षीय सोनिया गांधी यांना २ जून रोजी कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. कोविड-१९ नंतरच्या गुंतागुंतीमुळे त्यांना १२ जून रोजी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोनिया गांधी यांना नवीन समन्स जारी केले आहेत. सोनिया गांधी यांना यापूर्वी ८ जून रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यासाठी नवीन तारीख देण्यास सांगण्यात आले होते. तपास यंत्रणा आधीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करत असून ते आज ईडीसमोर हजर झाले आहेत.
congress chief sonia gandhi discharge from gangaram hospital ed enquiry