इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काँग्रेसचे नवीन अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची खिल्ली उडवणे तामिळनाडूतील एका नेत्याला चांगलेच महागात पडले आहे. तामिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघमने काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांची खिल्ली उडवली म्हणून पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यावर थेट कारवाई केली आहे. डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे कार्यकर्ते के. एस. राधाकृष्णन यांनी ट्विटरवर केलेल्या एका पोस्टमध्ये मल्लिकार्जू खर्गे यांची खिल्ली उडवली होती. या बाबीची दखल घेत द्रमुकचे सरचिटणीस एस दुराईमुरुगन यांनी शुक्रवारी राधाकृष्णन यांच्यावर कारवाईची घोषणा केली.
के. एस. राधाकृष्णन यांनी ट्विटरवर केलेल्या एका पोस्टमध्ये खर्गेंची खिल्ली उडवली होती. त्यामध्ये खर्गे यांना उद्देशून कथित मनमोहन २.0 म्हणून दाखवण्यात आले होते. त्या पोस्टमधून द्रमुकच्या त्या माजी नेत्याने थेट गांधी कुटुंबीयांवर हल्ला केला होता.
या नेत्यावर कारवाई झाली असली तरीदेखील अजूनही गांधी घराण्याच्या हातात सत्ता असल्याचे बोलले जात आहेच. मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्यांदा मिळालेल्या कार्यकाळातही सर्व सत्ता ही गांधी घराण्याकडेच होती, त्याचप्रमाणे खर्गे असल्याचे त्यामध्ये दाखवण्यात आले होते.
याविषयी दुरैमुरुगन यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, राधाकृष्णन यांना “पक्ष शिस्तीचे उल्लंघन केल्याबद्दल आणि पक्षाची बदनामी केलेल्या घटनेमुळे प्राथमिक सदस्यत्व आणि पक्षाच्या इतर सर्व पदांवरून त्यांची हक्काल पट्टी केली आहे. ” राधाकृष्णन यांच्यावर तात्काळ आणि कठोर कारवाई केल्यानंतर मात्र मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी त्यांच्या मंत्र्यांना आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्टॅलिन यांनी ९ ऑक्टोबर रोजी पक्षाचे अध्यक्ष म्हणून आपला कार्यकाळ दुसऱ्यांदा सुरू केला. “एकीकडे मी डीएमकेचा नेता आहे, तर दुसरीकडे मी तामिळनाडूचा मुख्यमंत्रीही आहे.” हे भान जपतच त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला होता.
Congress Chief Mallikarjun Kharge Mocked Leader