नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पदभार स्वीकारताच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी पक्षाच्या सुकाणू समितीची घोषणा केली आहे. त्यात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या समितीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना स्थान देण्यात आले आहे. जोपर्यंत काँग्रेसची नवी कार्यकारिणी स्थापन होत नाही तोपर्यंत पक्षाचे कामकाज सुकाणू समितीच्या माध्यमातून चालणार आहे.
यापूर्वी काँग्रेस वर्कींग कमिटी (CWC) ही काँग्रेसची सर्वात मोठी निर्णय घेणारी संस्था आहे, परंतु जोपर्यंत ती स्थापन होत नाही तोपर्यंत सर्व निर्णय सुकाणू समितीच्या माध्यमातून घेतले जातील. CWCची घोषणा पक्षाच्या पूर्ण अधिवेशनात केली जाईल. पक्षाच्या घटनेनुसार, १२ सदस्य नामनिर्देशित केले जातात आणि ११ निवडले जातात. बुधवारी CWCच्या सर्व सदस्यांनी राजीनामे दिले होते जेणेकरून नवीन समिती सहजपणे स्थापन करता येईल.
नव्या समितीत या नेत्यांचा समावेश
काँग्रेसच्या सुकाणू समितीमध्ये एकूण ४७ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राहुल गांधींशिवाय सोनिया गांधी, डॉ.मनमोहन सिंग, ए के अँटनी, अभिषेक मनू सिंघवी, अजय माकन, अंबिका सोनी, आनंद शर्मा, अविनाश पांडे. गायखंगम, हरीश रावत, जयराम रमेश, जितेंद्र सिंग, कुमारी सेलजा, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक, ओमन चंडी, प्रियांका गांधी, पी चिदंबरम, रणदीप सिंग सुरजेवाला, रघुबीर मीना, तारिक अन्वर, ए चेल्ला कुमार, अधीर रंजन चौधरी, भक्त चारण , देवेंद्र यादव, दिग्विजय सिंग, दिनेश गुंडू राव, हरीश चौधरी, एचके पाटील, जय प्रकाश अग्रवाल, केएच मुनियप्पा, बी मणिकम टागोर, मनीष चतरथ, मीरा कुमार, पीएल पुनिया, पवनकुमार बन्सल, प्रमोद तिवारी, रजनी पाटील, रघु शर्मा, संजीव शुक्ला, सलमान खुर्शीद, शक्तीसिंह गोहिल, टी सुब्बीरामी रेड्डी, तारिक हमीद शामली.
थरूर यांच्यासह या नेत्यांना डावलले
आनंद शर्मा, मुकुल वासनिक या काही निवडक नेत्यांशिवाय G23 च्या नेत्यांना काँग्रेसच्या प्रशासकीय समितीमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे शशी थरूर यांनाही या सुकाणू समितीतून डच्चू देण्यात आला आहे. याशिवाय ज्येष्ठ नेते मनीष तिवारी, पी जे कुरियन, पृथ्वीराज चव्हाण, भूपेंद्र हुडा यांनाही या यादीतून बाहेर ठेवण्यात आले आहे. या नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाचे नेतृत्व बदलण्याची विनंती केली होती.
Congress Chief Kharge Appoint New Committee
Politics