मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर होत आहे. गेल्या काही दिवसात महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. या सर्व परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे सांगत महागाईच्या विरोधात येत्या ३१ मार्चपासून आंदोलन करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. तशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. बघा, ते काय म्हणाले (व्हिडिओ)
गरज सरो, वैद्य मरो वृत्तीचे केंद्रातील भाजप सरकार निवडणुका संपताच
महागाई भडकवते. या संवेदनहीन आणि निर्लज्ज सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष ३१ मार्चपासून ७ दिवस महागाईच्या विरोधात आंदोलन छेडणार आहे. pic.twitter.com/2xYuLFKyhM— Nana Patole (@NANA_PATOLE) March 27, 2022