मुंबई – राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसनेही सावध भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे काही आमदार नॅाट रिचेबल झाल्यामुळे काँग्रेसने सर्व आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत असलेल्या आमदारांना दुपारी १२ वाजता तर मुंबई बाहेर असलेल्या आमदारांना दुपारी ४ वाजता मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिले आहे. शिवसेनेचे अनेक आमदार हे भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अशी फुट फडू नये यासाठी ही काळजी घेतली जाणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत अगोदरच काँग्रेसला धक्का बसला आहे. त्यात आता तो पुन्हा बसू नये या आमदारांना काँग्रेसने एकत्र बोलावले आहे.