इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. यात विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केला असून त्याबाबत नेमका काय निर्णय झाला हे अद्याप समोर आलेले नाही. या बैठकीत आगामी निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीनंतर काँग्रेस नेते विजय वेडट्टीवार यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांची आज आम्ही भेट घेतली. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधान सभा आणि विधान परिषदेतील रिक्त विरोधी पक्षनेते पद तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विधानसभा उपनेते अमीन पटेल उपस्थित होते.
तर बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीत विधानपरिषद व विधानसभेच्या विरोधी पक्षाच्या निवडीबाबतही चर्चा झाली. हे दोन्ही पद रिकामे आहे. त्यामुळे विधानपरिषदेसाठी सभापती राम शिंदे तर विधानसभेसाठी अध्यक्ष व मुख्यमंत्र्याची आम्ही भेट घेणार आहोत.