इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आज माजी मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीदरम्यान देशाच्या सध्याच्या राजकीय प्रवाहांवर, लोकशाही मूल्यांवर आणि विचारधारांच्या बदलत्या पटावर मनमोकळा संवाद झाल्याचे ते म्हणाले. या खास प्रसंगी सपकाळ यांनी खासदार राहुल गांधी यांच्या जीवनावर आधारित “राहुल गांधी” हे पुस्तक भेट दिले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे बोलले जात आहे. महायुतीत राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेनेचा ठाकरे गट व काँग्रेस हे तीन मोठे पक्ष आहे.