मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. त्यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख, यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला आहे. तर काही मोठे नेते पराभवाच्या छायेत आहे. या दिग्गज नेत्यांबरोबरच एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे, अमित ठाकरे, बाळा नांदगावकर यांचा पराभव झाला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत महायुतीने २८८ पैकी २२४ जागेवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी ५२ जागेवर आघाडी घेतली आहे. इतर १२ जागेवर आघाडी आहे. महायुतीत भाजप १३०, शिवसेना शिंदे गट ५४, अजित पवार गट ४० जागेवर आघाडी आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस १९, ठाकरे गट २०, राष्ट्रवादी शरद पवार गट १३ जागेवर आघाडीवर आहे. एकुण कल बघता महायुतीची सरशी विधानसभा निवडणुकीत झाली असून त्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले असून त्यात मोठ्या नेत्यांचा पराभव झाला आहे.