इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः अलीकडेच एका व्हिडीओमध्ये मौलाना खलीलूर रहमान सज्जाद नोमानी यांनी मुस्लिम समाजाला आवाहन केले होते, की अशा लोकांची हुका-पाणी बंद करावी. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यासह अनेक काँग्रेसजनांची विधाने समोर येत आहेत. त्यात काँग्रेस नेते मौलाना यांच्या वक्तव्यावर टीका करीत आहेत.
चिदंबरम म्हणाले, की आम्ही अशा धार्मिक विधानांचे समर्थन करत नाही. धर्माच्या नावावर मते मागणे चुकीचे आहे. कामाच्या जोरावर मते मागायला हवीत. मौलाना खलील-उर-रहमान सज्जाद नोमानी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, की माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत.
मौलाना यांच्या वक्तव्यापासून काँग्रेसने स्वतःला दूर केले. काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले, की मला मौलाना यांचे म्हणणे योग्य वाटत नाही. इथे लोकशाही आहे. सर्वांना अधिकार आहेत. तो ज्याला वाटेल त्याला मतदान करू शकतो. अशा प्रकारे सामाजिक बहिष्काराची चर्चा चुकीची आहे. लोकशाहीत प्रत्येकाला हक्क आहेत. धर्माच्या नावावर मते मागणे चुकीचे आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे प्रवक्ते मौलाना खलील-उर-रहमान सज्जाद नोमानी यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.