रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राहुल-प्रियंकाचा रोड शो

by India Darpan
नोव्हेंबर 11, 2024 | 7:02 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 26

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वायनाडः काँग्रेस नेते राहुल गांधी आज केरळ दौऱ्यावर आहेत. वायनाडमध्ये त्यांनी प्रियंका गांधी यांच्यासोबत रोड शो केला. दोघेही सुलतान बथेरी येथील रोड शोमध्ये सहभागी झाले होते.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका वायनाडमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी रिंगणात आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. प्रियंका यांनी वायनाडच्या सुलतान बथेरीमध्ये रोड शो केला. या वेळी राहुल म्हणाले, की जेव्हा मी पहिल्यांदा ‘भारत जोडो’ यात्रेला गेलो होतो, तेव्हा मला थोडे आश्चर्य वाटले कारण ती राजकीय यात्रा होती. प्रवासाचा उद्देश राजकीय होता; पण प्रवासाच्या अगदी सुरुवातीलाच माझ्या लक्षात आले, की मी लोकांना मिठी मारत होतो आणि लोक मला किस करत होते. मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणत होतो आणि तो म्हणत होता की आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. आज जेव्हा मी विमानात होतो, तेव्हा मला जाणवले, की मी राजकारणात ‘प्रेम’ हा शब्द अनेक वर्षे वापरला नव्हता. वायनाडला आल्यानंतर मी राजकारणात अचानक ‘प्रेम’ हा शब्द वापरायला सुरुवात केली. मला जाणवले, की वायनाडच्या लोकांनी मला इतके प्रेम आणि आपुलकी दिली, की माझे संपूर्ण राजकारणच बदलून गेले. वायनाडच्या लोकांनी मला शिकवले, की या शब्दाला राजकारणात खूप महत्त्वाचे स्थान आहे.

प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी याआधीही रोड शोमध्ये भाग घेतला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. अशा परिस्थितीत त्यांनी वायनाड मतदारसंघाचा राजीनामा दिला. आता या जागेवरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढवत आहेत. प्रियंका यांच्या विरोधात भाकपकडून सत्यन मोकेरी आणि भाजपकडून नव्या हरिदास यांनी निवडणूक लढवली आहे. काँग्रेस पक्षाची ही जागा अत्यंत सुरक्षित मानली जाते..

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प यांची पुतीन यांच्यांशी चर्चा

Next Post

नांदगाव मतदार संघात या ठिकाणी समीर भुजबळ यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक…

Next Post
IMG 20241111 WA0415 2

नांदगाव मतदार संघात या ठिकाणी समीर भुजबळ यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011