नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसने महाराष्ट्राच्या नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रवींद्र वसंतराव चव्हाण आणि मेघालयातील गांबेग्रे विधानसभा पोटनिवडणुकीसाठी जिंगजंग एम. माराक यांना उमेदवारी दिली आहे.
नांदेड लोकसभेत वसंतराव चव्हाण हे निवडून आले होते. पण, त्यांचे निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणुक होत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यानंतरही काँग्रेसने हा गड राखला. आता येथे पोटनिवडणुक होत आहे.