नाशिक – नाशिक मनपाचे अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये हा औपाचारिक प्रवेश सोहळा झाला असला तरी जाहीर प्रवेश ते नाशिकमध्ये पटोले यांच्या उपस्थितीत करणार आहे. आज मुंबईत या औपाचारिक प्रवेश सोहळ्यात त्यांच्याबरोबर यावेळी शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेविका डॅा. हेमलता पाटील, नसीम खान, हनिफ बशीर सह कार्यकर्ते उपस्थितीत होते. मुशीर सय्यद यांच्या कॅाग्रेस प्रवेशामुळे बळ वाढणार आहे.
मुशीर सय्यद हे जुन्या नाशिकमधील आक्रमक नगरसेवक म्हणून ओळखले जातात. त्यांनी समाजवादी पार्टीची नाशिक शाखा उघडण्यात पुढाकार घेतला होता. ते नगरसेवकही समाजवादी पार्टीकडून झाले होते. पण, नंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. या पंचवार्षिक निवडणुकीत ते अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून गेले.
महानगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे काही महिने बाकी असतांना हा प्रवेश काँग्रेसला बळ देणारा ठरला आहे. मुशीर सय्यद यांची शहराध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.