इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लैंगिक संबंधांवेळी कंडोम वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. जोडीदाराच्या स्पष्ट परवानगीशिवाय लैंगिक संबंधावेळी कंडोम काढणे हा गुन्हा आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पण, हे न्यायालय भारताचे नसून कॅनडाचे आहे. या निर्णयाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे.
वास्तविक शारीरिक कंडोम, हा इतका उपयोगाचा, सहज उपलब्ध असणारा आणि वापरायलाही सोपा असताना, गैरसमजांमुळे दुर्लक्षित असे साधन झाले आहे. लैगिक संबंधांचा निर्भेळपणे आनंद लुटायला हा मदत करतो परंतु चुकीच्या धारणेमुळे पुरुष कंडोम वापरणे नाकारतात. कंडोमबाबत फारशी जागरूकता दिसत नाही. याउलट ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी असे काही साधन उपलब्ध असते, याचीच माहिती नसते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
मात्र यावर सन 2017 मधील एका प्रकरणात कॅनडाच्या न्यायालयाने एक निर्णय दिला आहे. एका वृत्तानुसार, 2017 मध्ये तक्रारदार महिला व रॉस मॅकेन्झी किर्कपॅट्रिक नावाच्या तरुणाची ऑनलाइन पद्धतीने ओळख झाली. पुढे लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहोत की नाही हे पाहण्यासाठी ते प्रत्यक्ष भेटले आणि नंतर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी भेटले.
लैंगिक संबंधावेळी कंडोमच्या वापराबाबत महिला आग्रही होती व तिने ही गोष्ट तिच्या पुरुष पार्टनरलाही सांगितली होती. याबाबत दोघांचीही सहमती आणि संमती होती. मात्र एका भेटीदरम्यान घडलेल्या सेक्समध्ये आरोपी पुरुषाने कंडोम घातला नव्हता, ज्याबाबत महिला अनभिज्ञ होती (तिने नंतर प्रतिबंधात्मक H.I.V. उपचार घेतले). त्यानंतर महिलेने तक्रार दाखल केली. या प्रकारांत रॉस मॅकेन्झी किर्कपॅट्रिक लैंगिक अत्याचाराचा आरोप होता.
मात्र जेव्हा ट्रायल कोर्टात केस उभी तेव्हा रॉसने असा युक्तिवाद केला की, आपण कंडोम घातला नसूनही तक्रारदार महिलेने लैंगिक संबंधांना संमती दिली होती. त्यावेळी ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांनी किर्कपॅट्रिकचा युक्तिवाद स्वीकारून त्याच्यावरील आरोप फेटाळले. मात्र हा निर्णय ब्रिटिश कोलंबिया कोर्ट ऑफ अपीलने रद्द केला व त्यांनी याबाबत नवीन खटला चालवण्याचा आदेश दिला. किर्कपॅट्रिकने या निर्णयाला देशाच्या सर्वोच्च न्यायालयात अपील केले. नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद पार पडला.
याचा निर्णय प्रसिद्ध करण्यात आला ज्यामध्ये म्हटले आहे, ‘कंडोमशिवाय लैंगिक संभोग ही गोष्ट कंडोमसह लैंगिक संभोगापेक्षा मूलभूत आणि गुणात्मकदृष्ट्या भिन्न शारीरिक क्रिया आहे.’ या निर्णयाला न्यायालयाने 5 विरूद्ध 4 मतांनी मान्यता दिली. न्यायालयाने पुढे म्हटले की, तक्रारदाराने सेक्ससाठी स्पष्टपणे कंडोम वापरण्याची अट घातली असेल तर, कंडोमचा वापर अप्रासंगिक, दुय्यम किंवा आकस्मिक असू शकत नाही.
जोडीदाराच्या संमतीशिवाय कंडोम काढून टाकणे हा कॅलिफोर्निया येथेही स्पष्टपणे गुन्हा आहे. गव्हर्नर गेविन न्यूजम यांनी फेब्रुवारीमध्ये या कायद्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केली. असे करणारे कॅलिफोर्निया हे पहिले राज्य ठरले आहे. येथे याबाबत नवा कायदा अस्तित्वात येत आहे.ज्यामध्ये लैंगिक संबंधावेळी संमतीविना कंडोम काढून टाकणे अवैध मानले जाईल.
Condom Use Supreme Court Historic Decision
Canada Sex Permission