मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. एनसीबीने त्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. तर, २५ कोटी रुपयांची मागणी केल्या प्रकरणाच्या कथित आरोपावरुन राज्य सरकारनेही चौकशी समिती नेमली आहे. म्हणजेच, या दोन चौकशांचा सामना सध्या वानखेडे करीत असतानाच आता त्यांच्या विरोधात तिसरी तक्रार दाखल झाली आहे. ठाणे शिवसेनेचे अॅड जयेश वाणी यांनी ठाणे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी याची चौकशी करुन सत्य बाहेर काढावे आणि दोषी वानखेडे यांना शिक्षा करावी, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.
मुंबईच्या M.R.A. मार्ग पोलिस ठाण्यात मी आज समीर ज्ञानबा वानखेडे उर्फ समीर दाऊद वानखेडे यांच्या विरोधात भा.दं.वि. ४०६,४०९,४२०,४६८ आणि १२०(ब) अन्वये उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तक्रार दाखल केली. मला पुर्ण विश्वास आहे की @CPMumbaiPolice या प्रकरणाची चौषकी करुन सत्य शोधून काढतील. pic.twitter.com/hEi3bXeOJ8
— Adv.Jayesh Wani – अॅड.जयेश वाणी (@jayeshwani) October 28, 2021