मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिस महासंचालकाकडे तीन वकीलांनी संयुक्त तक्रार केली आहे. वरळी येथील ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. अॅड. नित्यानंद शर्मा, अॅड. पंकज कुमार मिश्रा आणि अॅड. आशिष राय यांनी ही तक्रार केली आहे.
परप्रांतीयावर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. त्यात मुख्य सुत्रधार आणि दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम एनएसए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे मुंबईतील राज ठाकरे यांच्या भाषणाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सुध्दा या पत्रात करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी ५ जुलैच्या मेळाव्यात भाषणादरम्यान परप्रांतीयासोबत अश्या कोणत्याही घटनेचा पुरावेकरिता कोणताही व्हिडिओ काढू नका ही सुचना स्पष्टपणे एका गंभीर आणि पूर्वनियोजित गुन्ह्याला सहकार्य करणार व त्यास प्रोत्साहन देणारी असल्याचे म्हटले आहे.