नाशिक – क्रांतीवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतत्तर, कर्मचारी यांना संस्थेच्या अध्यक्षांच्या पुत्राने अरेरावी करत शिवीगाळ केल्याची तक्रार संस्थेचे चिटणीस अॅड. तानाजी जायभावे यांनी संस्था प्रशासनाकडे तर, संचालक अॅड. जयंत सानप यांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे केली आहे. संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांचे सुपुत्र आदित्य थोरे यांच्याकडून ही अपमानास्पंद वागणूक दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रमात होता. त्यात हा प्रकार झाला आहे.
या घटनेबाबत समजेलली माहिती अशी की, अभियांत्रीकी महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष यांची सुन व तीच्या वर्गातील मैत्रिणीमध्ये वाद झाले. त्यानंतर सुनेने पती अदित्य थोरे यांना फोन करून महाविद्यालयात बोलवून घेतले. त्यानंतर त्यांनी प्राचार्य व प्राध्यापकांशी चर्चा न करता ही संस्था माझ्या बापाची आहे, तुम्ही मला ओळखल नाही का ? अशा एकेरी भाषेत, आर्वाच्च भाषेत वाद घातला. ज्या मैत्रिणीबरोबर बाद झाला तीला परिक्षेत नापास करा अशी मागणी त्यांनी केली. या प्रकारानंतर आदित्य थोरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.