इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील चलन बाजारात सध्या गोंधळ सुरू आहे. डॉलरसह, काही निवडक चलन वगळता, सर्वांच्या किंमती खाली आल्या आहेत, या पार्श्वभूमीवर लंडनमधील एका वित्तीय कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सोन्यामध्ये पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या सीईओचे म्हणणे आहे की, देशातील चलनाची किंमत दररोज वेगाने खाली जात आहे, तेव्हा कर्मचाऱ्यांना आधार देण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. लंडनच्या टॅलीमनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना पौंड (ब्रिटनचे चलन) ऐवजी सोने देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कंपनीने ट्रायल प्रोजेक्ट म्हणून ते सुरू केले आहे.
याबाबत बोलताना कंपनीचे सीईओ कॅमेरून पॅरी म्हणाले की, हे सिद्ध झाले आहे की महागाईच्या विरोधात सोने हा चांगलाचा पर्याय आहे. जेव्हा पारंपारिक चलनाची किंमत कमी होते. मग सोन्याचा भाव वाढतो, ज्यामुळे लोकांना महागाईच्या तुलनेत एक पाऊल पुढे राहण्याची संधी मिळते. पॅरी पुढे म्हणाले की, देशात प्रत्येक गोष्टीची किंमत झपाट्याने वाढत आहे. राहणीमान आणि जेवणही महाग होत आहे. त्यामुळे पगार वाढवण्यात अर्थ नाही. देशाच्या चलनाचे मूल्य दिवसेंदिवस झपाट्याने घसरत असताना अशा परिस्थितीत रोखीने पगार देणे योग्य नाही, असे त्यांचे मत आहे.
शेवटी ते म्हणाले की, मोठ्या जखमेवर मलमपट्टी करावी लागते, तिथे फक्त बँड-एड लावून काम करता येत नाही. टेलिमोनी कंपनीत 20 कर्मचारी आहेत. ही योजना सुरू करण्याच्या पहिल्या टप्प्यात कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोन्यामध्ये पगार दिला जाणार आहे.
तसेच त्यानंतर कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ते लागू केले जाईल.
सोन्यामध्ये पगार दिला म्हणजे कर्मचार्यांना प्रत्यक्षात सोने दिले जाईल असे नाही. सध्याच्या विनिमय दरानुसार कर्मचारी त्याच्या गरजेनुसार रोख रक्कम काढू शकेल.