इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कारले हे कडूच असते, त्यामुळे ते औषधी असले तरी कोणालाही आवडत नाही, त्यामुळे नावडत्याला कारलाची उपमा दिली जाते, त्याच प्रमाणे कोणत्याही कंपनी किंवा कार्यालयात मालक, व्यवस्थापन किंवा प्रशासन हे कर्मचाऱ्यांना बरेचदा वेटबिगार समजते आणि त्यांच्या कडून खूप काम करून घेते, तसेच कामात चूक झाली, टाळाटाळ केली किंवा समाधान कारक काम केले नाही तर शिक्षा देखील करते. चीनमधील एका कंपनीने टार्गेट पूर्ण केले नाही म्हणून या कंपनीने कर्मचाऱ्यांना कारले खाण्याची अजब शिक्षा दिली, त्यामुळे त्यांचे तोंड कडू पडले असून या विचित्र शिक्षेने सर्व कर्मचारी हैराण झाले आहेत.
रांगेत उभे करुन
एका रिपोर्टनुसार, चीनच्या जियांगशू प्रांतामधील Suzhou Danao Fangchengshi Information Consulting या कंपनीत कठोर नियम असून ही कंपनी शैक्षणिक आणि प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीने काही कर्मचाऱ्यांना एक टार्गेट दिले होते. मात्र टार्गेट पूर्ण न करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीने ही अजब शिक्षा दिली. सदर कर्मचारी कार्यालयात येताच एका रांगेत उभे करुन कारले खाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. कामची गरज असल्याने आणि नोकरीवरून काढू टाकू नये म्हणून कंपनीच्या आदेशाने कर्मचाऱ्यांनी कारले खाल्ले. त्यानंतर मात्र कंपनीने वाद वाढल्यावर कर्मचाऱ्यांनी अनुमती दिल्यावरच ही शिक्षा अंमलात आणण्यात आल्याची सफाई पेश केली. आता या कंपनी विरोधात सोशल मीडियावर टीकेचा पाऊस पडत आहे.
शिक्षा म्हणजे…
सकाळी कार्यालयात येताना आपल्याला अशी काही शिक्षा होईल याची कर्मचाऱ्यांना कल्पनाच नव्हती. उद्दिष्ट पूर्ण केले नाही. चांगली कामगिरी न बजावल्याने कंपनीने त्यांना शाब्दीक मार तर दिलाच पण कायम लक्षात राहील अशी शिक्षा सुनावली. या शिक्षेमुळे या कर्मचाऱ्यांचे तोंड कडू पडले. या शिक्षेविरोधात सोशल मीडियावर टीका झाली तरी त्याचा कंपनीवर काहीच परिणाम झालेला नाही. आता यासंबंधीचे व्हिडिओ आणि छायाचित्र चीनसहीत जगभरातील सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाले. या शिक्षेमुळे चीनमधील नागरिकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. परंतु या उलट दुसरीकडे अपमान करण्यासाठी ही शिक्षा देण्यात आली नाही. कौतूक आणि शिक्षा या नियमातंर्गत हा प्रकार करण्यात आला. कर्मचारी अशा शिक्षेपासून वाचण्यासाठी अधिक मेहनत करतील, असे या कंपनीचे म्हणणे आहे. ही शिक्षा इजा पोहचवणारी नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.