रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या, झोपा आणि पगार मिळवा; या कंपनीची भन्नाट ऑफर

by India Darpan
ऑगस्ट 24, 2022 | 5:06 am
in राष्ट्रीय
0
sleep1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कुठलीही कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना काम केल्यानंतर पैसे देते. काम केल्याशिवाय कुठलीही कंपनी पगार देत नाही. किंबहुना काम कमी केले म्हणून पगार कमी केला जातो. तर जे जास्त काम करतात त्यांना अधिक पगार दिला जातो. पण, एखाद्या कंपनीने चक्क झोपण्याची नोकरी दिली तर.. किंवा झोपण्याचाच पगार दिला तर… वाचून नवल वाटले ना. पण हे सत्य आहे.

आहाराप्रमाणेच मानवाला आहाराप्रमाणेच निद्रा म्हणजेच झोप आवश्यक असते, ती त्याची मूलभूत गरज आहे. परंतु दैनंदिन कामकाज करत असताना विशेषतः कोणत्याही कार्यालयात ( ऑफिसमध्ये ) किंवा कंपनीमध्ये काम करताना डुलकी घेणे अथवा झोपले तर योग्य ठरत नाही, त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला मेमो भेटू शकतो किंवा कामावरून कमी देखील केल्या जाऊ शकते. परंतु एक नोकरी अशी आहे की, त्या ठिकाणी झोप हीच आवश्यक ठरणारी गोष्ट आहे. हे ऐकून किंवा वाचून कदाचित कुणालाही आश्चर्य वाटेल. परंतु हे सत्य आहे अमेरिकेतील एका कंपनीने अशी नोकरी आणली आहे, जिथे नोकरी करताना झोपणे आवश्यक असेल. म्हणजेच ज्यांना खूप गाढ झोप लागते, असे नागरिक या पदासाठी आदर्श उमेदवार ठरतील.

अमेरिकेतील मॅट्रेस कंपनी कॅस्परने ही भन्नाट नोकरी आणली आहे. या कंपनीने आपल्य़ा वेबसाईटवर Casper Sleepers जॉब प्रोफाईलसाठी काही पात्रतासुद्धा नमूद केल्या आहेत. त्याशिवाय कंपनीने ड्रेसकोडसुद्धा कूल ठेवला आहे. हे काम करण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार हे उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. न्यूयॉर्कस्थित कॅस्पर कंपनीची स्थापना सन २०१४ मध्ये झाली होती.
कंपनीने आपल्या वेबसाईटवर या नोकरीबाबत जी माहिती दिली आहे. त्यानुसार जे कुणी या नोकरीसाठी अर्ज करणार असतील त्यांच्यामध्ये झोप येण्याची असामान्य क्षमता असली पाहिजे. त्याशिवाय टिकटॉक व्हिडीओ बनवून कॅस्परच्या सोशल मीडिया चॅनेलवर ते पोस्ट करावे लागतील.

व्हिडीओमध्ये उमेदवारांना मॅट्रेसवर झोपण्याचा अनुभव सांगावा लागेल. या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ज्या उमेदवारांची निवड होईल, ते कामादरम्यान पायजमा परिधान करू शकतात. त्याशिवाय कंपनीच्या प्रॉडक्ट्सचा फ्रीमध्ये वापर करू शकतात. तसेच त्यांना कामाच्या तासांमध्ये काही सवलतही मिळेल. कंपनीने सांगितले की, जे कुणी उमेदवार या पदासाठी स्वत:ला पात्र समजतातत, त्यांनी आपल्या स्लीप स्किलचा टिकटॉक व्हिडीओ बनवून अर्जासह शेअर करावा.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक असलं पाहिजे. मात्र मुख्य पात्रता ही त्याला कुठल्याही परिस्थितीत झोपण्याची आहे. सदर कंपनीने सांगितले की, या पदासाठी न्यूयॉर्कमधील नागरिकांनी अर्ज केल्यास ते अधिक चांगले होईल. मात्र इतर शहरांमधील नागरिकही अर्ज करू शकतात.

Company Offer Sleeping Salary Social Viral

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

१५ वेळा एकच हॉरर सिनेमा पाहिला… स्वतःला भूत समजला… पुनर्जन्म होईल म्हणून त्याने चक्क हे केले…

Next Post

निरोगी आणि दीर्घायुषी व्हायचं आहे? मग हे बिल्कुल खाऊ नका

Next Post
प्रातिनिधीक फोटो

निरोगी आणि दीर्घायुषी व्हायचं आहे? मग हे बिल्कुल खाऊ नका

ताज्या बातम्या

nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011