मनीष कुलकर्णी, मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
तुम्ही आयओएस बेस्ड व्हॉट्सअॅप युजर आहात, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअॅपने नवे फिचर कार्यान्वित केले आहे. या फिचरमुळे युजर्सना प्रोफाइल पिक्चरसह नोटिफिकेशन मिळणार आहे. व्हॉट्सअॅपचे हे २०२२ मधील पहिलेच फिचर असणार आहे. नव्या फिचरमुळे प्रोफाइल पिक्चर येण्याने आवश्यक मेसेज गहाळ होणार नाहीत. व्हॉट्सअॅप उघडले नाही तरीही कोणी मेसेज पाठवला हे समजू शकणार आहे. सध्याच्या परिस्थितीत एकाच वेळी अनेक मेसेज एकदम आल्याने महत्त्वाचे मेसेज नजरेआड जाऊ शकतात.
अँड्रॉइड युजर्सना
सध्या हे फिचर अँड्रॉइड युरर्ससाठी उपलब्ध नसेल. आयओस प्लॅटफॉर्मच्या सपोर्टनंतर लवकरच अँड्रॉइड युजरसाठी प्रोफाइल पिक्चर मोड कार्यान्वित करण्याची आशा आहे. व्हॉट्सअॅप अपडेट्स ट्रॅक करणार्या WABetalnfo या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरची आयओएस युजर्ससाठी बिटा टेस्ट सुरू आहे. ते लवकरच आयओएस युजर्सासाठी कार्यन्वित करण्यात येणार आहे. नव्या फिचरमध्ये चॅट आणि ग्रुपमधून नवे मेसेज प्राप्त झाल्यावर व्हॉट्सअॅपने नोटिफिकेशनमध्ये प्रोफाइल फोटो सहभागी करण्यासाठी सपोर्ट जोडले आहे.
व्हॉट्सअॅप कम्युनिटी फिचर
व्हॉट्सअॅपतर्फे नवे कम्युनिटी फिचरही कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामध्ये दहा व्हॉट्सअॅप ग्रुप्सना एकत्र लिंक करून एक कम्युनिटी बनवू शकता येणार आहे. कम्युनिटी ग्रुप बनविण्यासाठी ग्रुपचे नाव आणि त्याबद्दल सविस्तर लिहावे लागेल. त्यानंतर युजर्स कम्युनिटी ग्रुप बनवू शकणार आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपप्रमाणे कम्युनिटीचा एक अॅडमिन असेल. ग्रुपमध्ये कोण मेसेज करेल किंवा नाही हे अॅडमिन ठरवणार आहे.