इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याच्या काळात प्रत्येकालाच आपल्याकडे स्वतःचे चार चाकी वाहन असावे, असे वाटते. त्यातच सध्या आकर्षक आणि दणकट अशा कार बाजारात उपलब्ध होत आहेत. तसेच वाहनांचे शौकीन असलेल्या ग्राहकांसाठी हा महिना आतापर्यंत खूप खास ठरला आहे. विशेष म्हणजे हा महिना संपायला जवळपास दोन आठवडे शिल्लक आहेत. या दरम्यान चार आकर्षक आणि मस्त कार लाँच होणार आहेत.
ऑटोमोबाईल उद्योगासाठी हे दोन आठवडे अतिशय रोमांचक असणार आहेत. येत्या दोन आठवड्यांत चार उत्तम कार भारतात दाखल होणार आहेत. अशा परिस्थितीत, आपण नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर काही काळ प्रतीक्षा करणे फायदेशीर ठरू शकते. सध्या लॉन्च होणाऱ्या या नवीन कार्सबद्दल जाणून घेऊया.
टाटा अल्ट्रोझ डीसीटी
Tata Motors ने सांगितले आहे की, दि. 21 मार्च रोजी Altroz DCT पेट्रोल ऑटोमॅटिक लॉन्च करेल. या आगामी हॅचबॅकची 21 हजार रुपयांमध्ये प्री-बुकिंग करता येईल. तसेच कंपनी कारमध्ये 1.2 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड इंजिन देणार आहे. तसेच हे इंजिन 86bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करेल.
जीप मेरिडियन
ही नवीन थ्री रो SUV येत्या 29 मार्च रोजी भारतात लॉन्च होणार आहे. ही SUV मे महिन्यात लाँच होणार आहे. ही आगामी एसयूव्ही जीप कमांडरसारखी दिसते. मेरिडियन जीप कंपासपेक्षा किंचित लांब आहे आणि अधिक केबिन जागा देते. जीप मेरिडियनमध्ये, कंपनी 2.0-लिटर 4-सिलेंडर मल्टी-जेट टर्बो डिझेल इंजिन 9-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडेल.
नवीन Ertiga व XL6
मारुती सुझुकीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने नवीन Ertiga आणि XL6 डीलरशिपवर नेण्यास सुरुवात केली आहे. तथापि, या दोन MPV च्या लॉन्च तारखेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कंपनी लवकरच या दोघांच्या लॉन्च डेटची घोषणा करेल. नवीन एर्टिगामध्ये हलके इंटीरियर आणि एक्सटीरियर बदल असतील. तसेच कंपनी आता या कारमध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन देणार आहे, जे 105bhp पॉवर आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स ऑफर करणार आहे. तसेच, XL 6 मध्ये कंपनी 6 आणि 7 सीट पर्याय देऊ शकते.