मुंबई – गेल्या दोन वर्षांपासून कोविड-१९चे संकट आणि सेमीकंडक्टर चिप्सच्या कमतरतेमुळे भारतीय वाहन उद्योग कठीण काळातून जात आहे. त्यात छोट्या ते मध्यम आकारापर्यंत, SUV ची मागणी सतत वाढत आहे. त्याचवेळी मारुती सुझुकीपासून, टोयोटा, महिंद्रा आणि होंडा सारख्या कार कंपन्या हुंडाई सिटरा, किया सेल्टोस, एमजी अॅस्टार, व्ही डब्ल्यू ताइगुन, आणि स्कोडा कुशाक यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी नवीन मध्यम आकाराच्या SUV तयार करत आहेत.
मारुती-टोयोटा
मारुती सुझुकी आणि टोयोटा मध्यम आकाराची SUV विकसित करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. सन 2023 मध्ये ही कार लॉन्च केली जाऊ शकते. नवीन मॉडेल टोयोटाच्या DNGA वर आधारित असण्याची शक्यता आहे. नवीन SUV टोयोटाच्या परदेशातील बाजारात सर्वाधिक विकल्या जाणार्या SUV, RAV4 वर आधारित असणार आहे. टोयोटा आधीच मारुतीची बलेनो आणि सबकॉम्पॅक्ट SUV व्हीटारा ब्रीझा ग्लान्झा आणि अर्बन Cruiser म्हणून विकत आहे.
महिंद्रा
महिंद्राने भारतात XUV500 वाहन पुन्हा आणण्याची अधिकृत घोषणा केली आहे. नवीन मध्यम आकाराच्या एसयूव्हीसाठी वापरले हे नाव वापरले जाईल, XUV300 आणि XUV700 दरम्यान स्थित असेल. नवीन मॉडेल 2024 पर्यंत लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. हे XUV300 प्लॅटफॉर्मच्या सुधारित आवृत्तीवर आधारित असेल.
होंडा
होंडा कार कंपनीने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, कंपनी नवीन मिड-साइड SUV वर काम करत आहे. हे 2023 पर्यंत लॉन्च केले जाऊ शकते. नवीन मॉडेल सिटी प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते आणि सिटी प्रमाणेच इंजिन पर्याय मिळू शकेल. यात मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह 1.5-लिटर 4-सिलेंडर i-VTEC पेट्रोल इंजिन मिळू शकते.