विशेष प्रतिनिधी, पुणे
भारतात आजच्या काळात चारचाकी गाड्या या आपल्या आयुष्याचा एक भाग बनल्या आहेत. विशेषत : कोरोना साथीच्या आजारामुळे प्रत्येक जण एक आव्हानात्मक आयुष्य जगत असताना, सार्वजनिक वाहनांऐवजी काही लोक आपल्या स्वतःच्या कार खरेदीकडे वळत आहेत. कार प्रेमी नवीन लॉन्च होणाऱ्या कारच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी खुषखबर आहे. या महिन्यात काही सुपर मॉडेल कार बाजारात दाखल होणार आहेत.
ह्युंदाई अल्काझर
एसयूव्ही कारची वाढती क्रेझ लक्षात घेऊन ह्युंदाई भारतीय बाजारात अल्काझर बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. नवीन ह्युंदाई अल्काझार ही कंपनीच्या 5 सीटर एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाची एक मोठी ऐडीशन आहे. अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटीसह 10.25-इंचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग व्हील कंट्रोल इत्यादी वैशिष्ट्यांसह तिचे इंटिरियर खास बनवले आहे.
तसेच, या कारला 1.5 लिटर क्षमतेचे नैसर्गिक आकांक्षी पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर क्षमतेचे डिझेल इंजिन दिले जाईल. याशिवाय 1.4 लीटर क्षमतेचे टर्बो चार्ज पेट्रोल इंजिन देखील दिले जाऊ शकते. गेल्या वर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात लाँच केले जाणार होते, परंतु कोरोना साथीमुळे, कंपनी आता पुढील महिन्यात म्हणजे जूनमध्ये लाँच करू शकते.
स्कोडा ऑक्टाविया 2O21
स्कोडा ऑटो इंडिया लवकरच आपली नवीन 2021 स्कोडा ऑक्टाविया सेडान कार भारतीय बाजारात आणणार आहे. जागतिक पातळीवर तिचे पदार्पण दोन वर्षांपूर्वी झाली होती, परंतु काही कारणांमुळे तिचे भारतात लाँचिंग थांबविण्यात आली.
नवीन 2021 ऑक्टावियाला 2.0 लिटर टीएसआय टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळेल. ते जास्तीत जास्त 190 एचपीची वीज निर्माण करेल. यासह ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक 7 स्पीड गिअर बॉक्सही देण्यात आला आहे. नवीन स्कोडा ऑक्टाविया त्याच्या आधीच्या मॉडेलपेक्षा आकारात किंचित मोठे आहे, स्कोडा इंडियाचे प्रमुख झॅक होलिस यांनी याची स्पष्ट केले आहे की, आमची कंपनी जूनमध्ये ऑक्टव्हियाची नवीन कार भारतात दाखल करेल.
फोक्सवॅगन टायगुन
जर्मनीची आघाडीची वाहन निर्माता कंपनी फोक्सवॅगन देखील नवीन टायगुन कार भारतात दाखल करण्याची योजना आखत आहे. कंपनीची नवीन एसयूव्ही नवीनतम एमक्यूबी प्लॅटफॉर्म अंतर्गत डिझाइन केली गेली आहे.
कंपनी यात 1.0 लिटर आणि 1.5 लिटर टीएसआय पेट्रोल इंजिन वापरणार आहे. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये 9O टक्के स्थानिक पार्ट वापरले आहेत. सदर कारला 1.0-लीटर पेट्रोल इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि स्वयंचलित गिअरबॉक्ससह येईल. त्याच वेळी मोठ्या इंजिनमध्ये 7 स्पीड स्वयंचलित गिअरबॉक्स देण्यात आला आहे.