मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – येत्या काही दिवसातच भारतीय बाजारपेठेत तगडे स्मार्टफोन्स लॉन्च होणार आहेत. यामध्ये सॅमसंग, रेडमी आणि ओप्पो या नामांकीत ब्रँडच्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. साधारणतः 4 फेब्रुवारीपासूनच हे स्मार्टफोन हळूहळू ग्राहकांना उपलब्ध होतील. Xiaomi द्वारे एक मेगा इव्हेंट आयोजित केला जात आहे. त्यामध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि स्मार्ट बँडसह सर्वोत्तम उत्पादने लाँच केली जातील. लवकरच लॉन्च होणारे स्मार्टफोन कोणते ते आपण आता जाणून घेऊया…
Oppo Reno 7 सीरीज
या स्मार्टफोनची लाँच तारीख – 4 फेब्रुवारी असून अपेक्षित किंमत 25,000 ते 45,000 रुपये आहे. या सीरीज अंतर्गत चार स्मार्टफोन्स लाँच केले जाऊ शकतात, Oppo Reno 7 5G, Oppo Reno 7 Pro, Oppo Reno 7 Pro 5G आणि Oppo Reno 7 SE 5G. OPPO Reno7 SE चीनमध्ये 6.43 इंच AMOLED फुल एचडी प्लस डिस्प्लेसह सादर करण्यात आला. यामध्ये 90HZ रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाईल. फोन इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर सपोर्टसह देण्यात येईल. सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. तर 48-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा फोनच्या मागील पॅनलवर उपलब्ध असेल. याशिवाय 2-मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो लेन्स दिला जाऊ शकतो. हा फोन Android 11 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. पॉवर बॅकअपसाठी, फोनला 4,500mAh बॅटरी मिळेल.
Redmi Note 11S
हा स्मार्टफोन 9 फेब्रुवारीला लॉन्च होणार असून Redmi Note 11S स्मार्टफोन 108MP क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह ऑफर केला जाईल. हा फोन एमोलेड डिस्प्ले सह येईल. तसेच फोनमध्ये 5G ऐवजी 4G कनेक्टिव्हिटी मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 108-मेगापिक्सेल ISOCELL HM2 सेंसर दिला जाऊ शकतो. तसेच यात 8-मेगापिक्सेल Sony IMX355 सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स सपोर्टसह देण्यात येईल. याशिवाय 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर सपोर्ट दिला जाईल. फोन MediaTek चिपसेट सह येईल. हा फोन Android 11 आधारित MIUI 13 वर काम करेल.
Samsung Galaxy S22 सीरीज
या फोनची लाँचिंग तारीख 9 फेब्रुवारी आहे. यामध्ये 6.8-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोन Exynos 2200 SoC किंवा Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह देण्यात येईल. Samsung Galaxy S22 Ultra साठी 128GB आणि 256GB स्टोरेज पर्यायांसह 8GB आणि 12GB रॅम व्हेरिएंट असतील. फोन 5,000mAh बॅटरीसह येऊ शकतो. यात अल्ट्रा 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड एंगल लेन्स, 108-मेगापिक्सेल वाइड एंगल शूटर, 3X ऑप्टिकल झूम ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 10-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स मिळेल. त्याच वेळी, दुसरा 10-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स 10X झूम आणि OIS सह देण्यात येईल.