मुंबई – भारतात अनेक ब्रँड आपल्या नव्या स्मार्टफोनचे अनावरण करण्याची तयारी करत आहेत. सॅमसंग २८ सप्टेंबरला देशात Galaxy M52 5G चे अनावरण करण्यास सज्ज झाली आहे. तसेच मोटोरोलाचा Motorola Edge 20 Pro, iQoo आणि Oppo सारख्या इतर कंपन्या लवकरच नव्या 5G डिव्हाइसची लवकरच घोषणा करणार आहेत. भारतात अनावरण होणार्या फोनची माहिती जाणून घेऊयात.
Xiaomi Mi 11 Lite NE 5G
Xiaomi Mi 11 Lite NE 5G या फोनचे २९ सप्टेंबरला भारतात अनावरण होणार आहे. फोनमध्ये डॉल्बी व्हिजन, स्रॅपड्रॅगन 778G SoC, 8GB रॅम, ट्रिपल कॅमेरा आणि 4,250 mAh च्या बॅटरीसह 6.55 FHD+ 90 Hz AMOLED डिस्प्ले आहे.
Motorola Edge 20 Pro
Motrola पुढील आठवड्यात भारतात दोन नव्या डिव्हाइसचे अनावरण करणार आहे. सर्वात प्रथम ३० सप्टेंबरला Moto Tab G20 या फोनचे अनावरण होईल. त्यानंतर १ ऑक्टोबरला Motorola Edge 20 Pro चे अनावरण केले जाईल. Motorola Edge 20 Pro मध्ये HDR10+ सपोर्टसह 144 Hz 10- बिट AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. Moto Tab G20 मध्ये TDDI तंत्रज्ञानासह 8 इंच HD+ IPS LCD डिस्प्ले असेल. हा मोबाइल Media Tek Helio P22T SoC ने संचालित केला जाईल. Moto Tab G20 चे ३० सप्टेंबरला अनावरण होईल. तर Motorola Edge 20 Pro चे १ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता अनावरण केले जाईल.
Samsung Galaxy M52
Amazon च्या एका डेडिकेटेड पेजच्या माहितीनुसार सॅमसंग २८ सप्टेंबरला भारतात Galaxy M52 च्या अनावरणाची तयारी करत आहे. अपकमिंग Galaxy M52 5G ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप सादर करणार आहे. यामध्ये एक पंच-होल डिस्प्ले आणि एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर असेल. हा डिव्हाइस ७.४ मिमि स्लिम बिल्ड असेल. तसेच हा फोन 6nm स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरवरून पावर घेईल. डिव्हाइसमध्ये AMOLED डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.
iQOO Z5 5G
iQOO इंडियाने ट्विटरवर सांगितले, की ते अत्याधुनिक iQOO Z5 स्मार्टफोनचे भारतात अनावरण करणार आहे. अनावरण सोहळा २७ सप्टेंबरला होईल. डिव्हाइसची किंमत ३० हजार रुपयांपर्यंत असण्याची अफवा आहे. आगामी iQOO Z5 या स्मार्टफोनला 120Hz रिफ्रेश रेटच्या सपोर्टसह AMOLED डिस्प्ले सादर करण्याची शक्यता आहे. हा फोन 55W वेगाने चार्जिंगसह 5G सपोर्टवर मिळण्याची शक्यता आहे.
Vivo X70 Series
व्हीवो एक्स७० फ्लॅगशिप लाइनअप ३० सप्टेंबरपासून आपली सुरुवात कर णार आहे. Zeiss-ऑप्टिस समर्थित Vivo X70 सीरिजचे या महिन्यात जागतिक पातळीवर ३,६९९ युआन (४२,१०० रुपये) किमतीवर अनावरण केले होते.
Oppo F19s
Oppo F19s या फोनचे भारतात २७ सप्टेंबरला अनावरण करण्यात येणार आहे. नव्या Oppo फोनचा सध्याच्या Oppo F19 तिकडीत समावेश होणार आहे. त्यामध्ये 5,000mAh ची बॅटरी अ असेल. ती 33W VOOC फ्लॅश चार्ज तंत्रज्ञानाला सपोर्ट करेल. फोन स्नॅपड्रॅगन 662 SoC Android 11 OS सोबत पाठवला केला जाऊ शकतो.