इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात इलेक्ट्रिक कारची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे, अशा सर्व दिग्गज ऑटोमेकर्स या मार्केटमध्ये येण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्याच वेळी देशातील सर्वात स्वस्त कार म्हणून ओळख असलेल्या टाटा नॅनो देखील इलेक्ट्रिक कार मध्ये रूपांतर करण्यात आले आहे म्हणजे पूर्वीचीच टाटा नॅनो , आता इलेक्ट्रिक टाटा नॅनो कार बनली आहे. परंतु अनेक जणांचा असा गैरसमज झाला आहे की, टाटाने नवीन इलेक्ट्रिक नॅनो कार बाजारात आणली आहे, परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही. प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचा ईव्हीसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे, कंपनीने लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या बदललेल्या कारसोबतचा रतन टाटा यांचा फोटो शेअर केला आहे, टाटा नॅनोचे ईव्हीमध्ये रूपांतर झाल्याची माहिती मिळताच रतन टाटा यांचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला.
या पोस्टवर विविध प्रतिक्रिया देण्यात आल्या, तर अनेकांना वाटले की टाटा नॅनो इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये लॉन्च होणार आहे. पण कारमध्ये इलेक्ट्रोड्राइव्ह पॉवरट्रेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडने बदल केले आहेत. तसेच फोटो शेअर करताना, कंपनीने त्याला कॅप्शन दिले आणि लिहिले की,’रतन टाटा यांना 72V नॅनो ईव्ही वितरित करणे आणि त्यांचा अभिप्राय मिळणे ही एक अतिशय अभिमानाची भावना आहे.’ टाटा नॅनो इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्ये म्हणजे या पेट्रोल कारमध्ये वापरण्यात आलेल्या लिथियम-आयन बॅटरीमध्ये बदल करून पूर्णपणे इलेक्ट्रिक कारमध्ये बदल करण्यात आले असून हे काम इलेक्ट्रा ईव्ही कंपनीने केले आहे.या कारला 60 किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी 10 सेकंद लागतात. त्याच वेळी, हे वाहन एका चार्जवर 160 किमीपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे.