नवी दिल्ली – स्मार्टफोनचा प्रसिद्ध ब्रँड सॅमसंग आता आपल्या दोन घडी करू शकणारे (फोल्डेबल) फोन Samsung Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 यांना लाँच करण्याच्या तयारीत आहे. यूट्यूबर John Prosser यांनी आगामी फोल्डेबल स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत आणि त्यांच्या वाहतुकीबाबत मोठा खुलासा केला आहे. परंतु सॅमसंग कंपनीकडून दोन्ही फोनबाबत अद्याप काहीच माहिती देण्यात आलेली नाही.
जॉन प्रोस्सर यांच्या माहितीनुसार, सॅमसंग आगामी Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 फोल्डेबल फोनला ३ ऑगस्टला होणार्या गॅलेक्झी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये लाँच करू शकते. या दोन्ही फोनची वाहतून २७ ऑगस्ट २०२१ रोजी सुरू करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय गॅलेक्झी वॉच ४ चेही लोकार्पण होण्याची शक्यता आहे.
फोनच्या संभाव्य किंमती
माध्यामांच्या वृत्तांनुसार, आगामी Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 फोल्डेबल फोनच्या किमती प्रीमियम रेंजनुसार ठेवली जाणार आहे. दोन्ही फोन वेगवेगळ्या रंगसंगतीत बाजारात उपलब्ध होतील.
Galaxy Z Fold ३ चे फिचर्स
सॅमसंगच्या Galaxy Z Fold 3 स्मार्टफोनला काळा, करडा आणि पांढर्या रंगाचा पर्याय असेल. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामध्ये पहिला १२ एमपीचा प्रायमरी लेंस, दुसरा १२ एमपीचा व्हाइड अँगल लेंस आणि तिसरा १६ एमपीचा सेंसर असेल. समोरील बाजूस १६ एमपीचा कॅमेरा असेल.
Galaxy Z Flip ३ चे फिचर्स
सॅमसंग Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन जांभळा, काळा, पांढरा आणि हिरव्या रंगात उपलब्ध असतील. या फोनमध्ये युजर्सना मोठा सेकंडरी डिस्प्ले मिळू शकतो. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये दमदार बॅटरीपासून शक्तीशाली प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गॅलेक्झी फ्लिपमध्ये १.१ इंचाची सेकंडरी स्क्रिन देण्यात आली आहे.