पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – सॅमसंग कंपनी लवकरच Galaxy Tab S8 मालिकेतील तिन्ही प्रकार भारतात उपलब्ध करून देणार आहे. Galaxy चे हे Tab S8 Ultra, Tab S8 Plus आणि Tab S8या तीन प्रकारात असून पुढील आठवड्यापर्यंत भारतात लॉन्च होऊ शकतात. टॅब S8 ची मालिका 60 हजारांपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.
Galaxy Tab S8 Ultra ची किंमत सुमारे 1 लाख 20 हजार रुपये असू शकते. Samsung Galaxy Tab S8 मध्ये 11-इंचाचा WQXGA LTPS TFT डिस्प्ले आहे ज्याची पिक्सेल घनता 276 ppi आहे. यामध्ये तुम्हाला Octa-Core SoC सह Snapdragon 8 Generation 1 मिळेल.यामध्ये 12 GB पर्यंत रॅम मिळवू शकता. टॅब्लेटमधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअप 13 MP प्राथमिक सेन्सर आहे, सोबत 6 MP अल्ट्रा-वाइड शूटर आहे. Samsung Galaxy Tab S8 Plusहा 120 Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह 266 ppi पिक्सेल घनतेसह 12.4-इंच WQXGA+ सुपर AMOLED डिस्प्लेसह येतो. टॅबलेट ऑक्टा-कोर SoC द्वारे समर्थित आहे. सोबतच 12 GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे. यात Galaxy Tab S8 प्रमाणेच ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.
Samsung Galaxy Tab S8 यात 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा पॅक असून टॅब्लेटमध्ये 240 ppi पिक्सेल घनता आणि 120 Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह मोठा 14.6-इंचाचा WQXGA+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे. यात समान 4nm ऑक्टा-कोर SoC समाविष्ट आहे, जो इतर दोन मॉडेल्सवर उपलब्ध आहे. हे ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह देण्यात येते, यामध्ये 13MP प्राथमिक सेन्सर आणि 6MP अल्ट्रा-वाइड शूटरचा समावेश आहे. सॅमसंगच्या वार्षिक गॅलेक्सी अनपॅक्ड 2022 मध्ये Galaxy S22, Galaxy S22 + आणि Galaxy S22 Ultra स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. यात Galaxy Tab S8 मालिका देखील लाँच करण्यात आली. याव्यतिरिक्त, सॅमसंग वॉलेट आणि वन UI4 सादर केले गेले.