मुंबई – टीव्ही, मोबाईल, टॅब यामध्ये दरवर्षी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होऊन नवीन मॉडेल बाजारात येत असतात. सहाजिकच नवीन मॉडेल घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. सध्याच्या काळात अनेक कंपन्यांमध्ये या तंत्रज्ञानाबाबत स्पर्धा आहे. रिलायन्स जिओ २०२२ मध्ये टेक्नॉलॉजीच्या जगतात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे.
Jio सध्या आपला पहिला टीव्ही Jio TV लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. एवढेच नाही तर कंपनी आपला पहिला टॅब Jio Tablet लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे हे दोन्ही प्रोडक्ट पुढील वर्षी बाजारात दाखल होऊ शकतात. जिओ टीव्ही आणि जिओ टॅबलेट मार्केटमध्ये कोणत्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह लॉन्च केले जातील, कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
Jio स्मार्ट TV
जिओचा पहिला टीव्ही स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही असू शकतो, कंपनी तो ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत देऊ शकते. यामध्ये इन-बिल्ट ओटीटी अॅप्स दिले जाऊ शकतात. कंपनी Jio TV सह Jio Fiber कनेक्शनमध्ये ऑफर केलेला सेट-टॉप बॉक्स देखील देऊ शकते. Jio TV अनेक स्क्रीन आकारात लॉन्च केला जाऊ शकतो.
आणखी काही गॅजेट्स
जिओची नवीन उत्पादने लाँच करण्याचा पॅटर्न पाहता असा अंदाज वर्तवला जात आहे की, कंपनी अॅपल आणि इतर मोठ्या कंपन्यांप्रमाणे स्वतःची इको-सिस्टम तयार करण्याचे लक्ष्य ठेवत आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी अपेक्षा केली की, येत्या काही दिवसांत जिओचे आणखी बरेच गॅजेट्स बाजारात येतील.
जिओ टॅबलेट
Jio टॅबलेट देखील Jio Phone Next सारख्या परवडणाऱ्या किमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. असे म्हटले जाते की, कंपनी Jio टॅबलेटमध्ये एक मोठा स्क्रीन असू शकतो आणि अॅप्स आणि गेम डाउनलोड करण्यासाठी त्याला प्री-इंस्टॉल केलेले Google Play Store दिले जाऊ शकते. हा टॅबलेट क्वालकॉमच्या कोणत्याही एंट्री लेव्हल चिपसेटवर आधारित असू शकतो. जिओचा हा टॅबलेट अत्यंत किफायतशीर दरात लॉन्च केला जाऊ शकतो. त्याची थेट स्पर्धा बाजारात आधीच अस्तित्वात असलेल्या रिअॅलिटी आणि मोटोरोलाच्या टॅबलेटशी असणार आहे.