मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा नेक्सॉनचे वर्चस्व कायम आहे. टाटा नेक्सॉनला भारतात चांगलीच पसंती मिळाली आणि ही कार प्रचंड विकली गेली, त्याचा कंपनीला खूप फायदा झाला. पण आता लवकरच Renault आपली सर्वोत्तम SUV Arcana भारतात लॉन्च करू शकते. ही एसयूव्ही टाटा नेक्सॉनला थेट टक्कर देईल, असा विश्वास आहे. Renault Arcana ची चाचणी भारतातही सुरू झाली आहे. हे लवकरच भारतात सादर केले जाऊ शकते. या नवीन SUV Arkana मध्ये काय खास असणार आहे. जाणून घेऊ या …
Renault Arkana मध्ये खूप प्रगत वैशिष्ट्ये पाहायला मिळतील, जी इतर SUV पेक्षा वेगळी ठरतील. कंपनी ही SUV भारतात 1.3 लीटर पेट्रोल इंजिनसह लॉन्च करू शकते. हे सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानासह सुसज्ज केले जाऊ शकते. कंपनी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेससह Renault Arcana देण्यात येऊ शकते. Renault Arcana च्या अंदाजे किंमतीबद्दल सांगण्यात येते की, भारतात त्याची किंमत 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते. तसेच कंपनी ही SUV 7 लाखांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करू शकते.
या कारच्या लुकबद्दल सांगायचे झाले तर, रेनॉल्ट अर्काना कूप स्टाइलमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. रेनॉल्ट अर्काना ही एक अतिशय आकर्षक एसयूव्ही असू शकते. ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा नेक्सॉनपेक्षा आकाराने थोडी मोठी असू शकते. त्याच्या समोरच्या साईडला DRL सह स्टायलिश टेललॅम्प्स पाहायला मिळतील. या SUV च्या स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर Renault Arkana ची थेट स्पर्धा Tata Nexon, Kia Seltos, Mahindra XUV300 आणि Hyundai Creta सोबत होईल, असे सांगण्यात येते.