इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडमधील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मनोरंजन विश्वात अक्षरशः भूकंप झाला. चित्रपट येण्यापूर्वीच त्याची निगेटिव्ह प्रसिद्धी झाली होती. त्यामुळेच प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने सिनेमा जगतात बऱ्यापैकी खळबळ माजवली. या चित्रपटामुळे एका बाजूला बंद पडलेले सिनेमागृह पुन्हा सुरू झाले तर दुसऱ्या बाजूला चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांचे पाय वळले. यापलीकडे जाऊन चक्क शो सुरू असताना प्रेक्षक स्क्रीनजवळ जाऊन नाचले. हे पठाणचं यश होत. यासोबत केवळ पाच दिवसांतच या चित्रपटाने जगभरात ५४३ कोटींचा गल्ला जमवला. आता ‘पठाण’च्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी मोठी घोषणा केली आहे.
‘पठाण’ला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर चित्रपटाच्या टीमने प्रसारमाध्यमांशी पहिल्यांदाच संवाद साधला. यावेळी ‘पठाण’नंतर आता बॉलिवूडमध्ये कोणता ब्लॉकबस्टर चित्रपट पाहायला मिळणार?” असा प्रश्न दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना सिद्धार्थ आनंद यांनी ‘पठाण’च्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. ‘पठाण २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सिद्धार्थ आनंद यांनी म्हटलं आहे. यामुळे आता प्रेक्षकांना ‘पठाण २’ चे वेध लागले आहेत.
https://twitter.com/yrf/status/1620116173751980032?s=20&t=hf0jiISIS6bgel8LI216fg
‘पठाण २’ मध्ये नवीन काय पाहायला मिळणार याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. सिनेमा पाहायला जात नाही अशा प्रेक्षकांना देखील ‘पठाण’ने सिनेमागृहात यायला भाग पाडलं आहे. या प्रेक्षकांनी देखील बाहेर पडल्यावर ‘पठाण’ची वाहवा केली आहे. ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं. त्यामुळे ‘पठाण’साठी शाहरुखचे चाहते आतूर होते. आता सिद्धार्थ आनंद यांना ‘पठाण २’ची घोषणा केल्यानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
https://twitter.com/yrf/status/1620369347683426304?s=20&t=hf0jiISIS6bgel8LI216fg
Coming Soon Pathaan 2 Director Anand Announcement