मुंबई – महिंद्रा स्कॉर्पिओचे २०२२ साली म्हणजेच पुढील वर्षी अनावरण होणार आहे. महत्त्वाच्या कारमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओचे स्थान निर्माण झालेले आहे. या कारचे अनावरण नेमके कधी होईल याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु माध्यमातील वृत्तांनुसार या कारचे अनावरण जूनमध्ये होऊ शकते.
या एसयूव्हीच्या नव्या मॉडेलमध्ये भक्कम इंजिन, अनेक कॉस्मेटिक बदल आणि फिचर अपग्रेड झालेले दिसून येतील. नवी महिंद्रा स्कॉर्पिओ २.० लिटर, ४ सिलिंडर ट्रोबचार्ज्ड पेट्रोल इंजिनासोबत मिळणार आहे. यामध्ये एक नवे २.०एल, ४-सिलिंडर mHawk डिझेल इंजिनही असेल. हे इंजिन १५५ बीएचपी आणि ३६० एनएम टॉर्क जनरेट करू शकेल. भारतात स्कॉर्पिओची Hyundai Alcazar या कारशी स्पर्धा असेल. ह्युंदईच्या एसयूव्ही २.०एल, ४ सिलिंडर पेट्रोल आणि १.५ एल, ४ सिलिंडर डिझेल इंजिनसह मिळते. हे इंजिन १९२ एनएमसह १५९ बीएचपी आणि २५० एनएमसह ११५ बीएचपी ऑफर करते. याचाच अर्थ असा की नवी Scorpio Alcazar पेक्षा महिंद्राची कार खूपच जास्त ताकदवान असेल.
एसयूव्हीमध्ये ६-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असू शकतो. हायर ट्रिमला AWD सिस्टिमसह सादर केले जाईल. नव्या महिंद्रा स्कॉर्पिओ २०२२ मध्ये आरामची पातळी, चालवण्याची गुणवत्ता आणि कामगिरीमध्ये सुधारणा दिसू शकतात. स्कॉर्पिओ ४ ऑफ रोड ड्राइव्ह मोडसह मिळू शकते.
बॉडी-ऑन-फ्रेम लॅडर चेसिसवर आधारित असलेली नवी २०२२ महिंद्रा स्कॉर्पिओ सध्याच्या पिढीपेक्षा मोठी आणि रूंद असेल. यामध्ये मोठी कॅबिन स्पेस आणि इतर फिचर्स असतील. हिच्या फिचर्समध्ये सर्व एलईडी हेडलँप आणि रिअर लाइट, टर्न इंडिकेटर्स, लेटेस्ट स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी, ९ इंचाचा टचस्क्रिन एचयू इन्फोटेन्मेंट सिस्टिम, कनेक्टेड कार फिचर्स, डुअल झोन क्लयमेट कंट्रोल, ३६० डिग्री कॅमेरा, सनरूफ, पुश बटन स्टार्ट, टेरेन रिस्पॉन्स मोड, एक डिजिटल एमआयडी, मल्टिपल एअरबॅगसह अनेक फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.