मुंबई – आधुनिक काळात आपल्याकडे अत्याधुनिक चारचाकी वाहन असावे, असे अनेकांचे स्वप्न असते. विशेष म्हणजे हे वाहन रफ अँड टफ म्हणजे दणकट असावे असेही अनेकांना वाटते. महिंद्रा कंपनी ग्राहकांची आवड लक्षात घेऊन नवनवीन वाहन बाजारात आणण्याचा प्रयत्न करत असतात.
महिंद्रा कंपनी आता आपली नवीन स्कॉर्पिओ SUV आणण्याच्या तयारीत आहे. नवीन पिढीतील महिंद्रा स्कॉर्पिओ अधिक प्रीमियम बनवली जाईल. नुकतेच नवीन मॉडेलचे काही फोटो लीक झाले आहेत, त्यामध्ये यातील बहुतांश फोटो हे इंटीरियर फीचर्स समोर आले आहेत. एका अहवालानुसार नवीन SUV मध्ये कॅप्टन सीट्स आणि ऑफरोडिंगसाठी विशिष्ठ मोड यासारखी प्रीमियम वैशिष्ट्ये मिळतील. SUV ला लो-रेंज गिअरबॉक्स देखील मिळतो.
आतील वैशिष्ट्ये
आतील वैशिष्ट्यांमध्ये नवीन स्कॉर्पिओला टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल, Apple CarPlay आणि Android Auto सह Alexa (XUV 700 प्रमाणे) ला देखील सपोर्ट करेल. याशिवाय सनरूफ 360 कॅमेरा ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, सोनी साउंड सिस्टीम आणि रूफ माऊंटेड स्पीकर यांसारखी वैशिष्ट्ये असतील. सेल्फीसाठी, कारला एअरबॅग, EBD सह ABS, पार्किंग सेन्सर्स, 360-डिग्री कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण मिळेल.
इंजिन आणि संभाव्य किंमत
या वाहनात 2.2 लिटर डिझेल आणि 2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन नव्या पिढीच्या स्कॉर्पिओमध्ये दिले जाऊ शकते. ही दोन्ही इंजिने अनुक्रमे 185PS आणि 185PS ची पॉवर जनरेट करतात. यात 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि रीअर व्हील ड्राइव्ह मिळेल. यामध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक आणि 4 व्हील ड्राईव्हची सुविधा पर्याय म्हणून असेल. सदर कंपनी 2022 च्या पहिल्या तिमाहीत नवीन स्कॉर्पिओ लाँच करू शकते. त्याची संभाव्य किंमत 10 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.