इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणताही ऐतिहासिक, पौराणिक किंवा अन्य कोणताही बिग बजेट चित्रपट असला की त्याचा सिक्वेल करणे हा अलीकडचा लेटेस्ट ट्रेंड आहे. मात्र, कन्नड चित्रपट ‘कांतारा’ या चित्रपटाच्या निर्माता, दिग्दर्शकांनी वेगळी वाट चोखाळायचे ठरवले असावे. सध्याच्या लेटेस्ट ट्रेंडपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचे ठरवत त्यांनी वेगळी वाट घेतली आहे.
‘कांतारा’च्या लोकप्रियतेनंतरच याचा आणखी एक भाग येणार असल्याचे दिग्दर्शक रिषभ शेट्टी यांनी सांगितले होते. नेहमीप्रमाणेच हा त्याचा सिक्वेल असेल, हे गृहीत धरून त्यात काय असेल याचे अंदाज बांधण्यास सुरुवात झाली. पण ऋषभ शेट्टी यांनी सगळ्यांचे अंदाज चुकवले. कारण ‘कांतारा’ चित्रपटाचा नव्याने येणार भाग हा त्याचा सिक्वेल नाही तर प्रिक्वेल असणार आहे. बहुधा अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असावा. आणि आपल्याकडील प्रेक्षकांसाठी देखील हा नवीनच प्रयोग आहे. थोडक्यात आता या प्रिक्वेलमध्ये गावकरी, राजा आणि दैव यांच्यातील नात्याची गोष्ट उलगडली जाणार आहे.
ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या चित्रपटाने यंदा संपूर्ण चित्रपटसृष्टी गाजवली. काही महिन्यांपूर्वीच रिषभ शेट्टीचा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि २०२२ मधील ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्याचा समावेश झाला. प्रेक्षकांना वेड लावत या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली. आता हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतही पोहोचला आहे. या चित्रपटाने सगळेच रेकॉर्ड्स मोडले. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी आणि त्यातल्या अभिनयासाठी ऋषभ शेट्टींचं खूप कौतुक केलं गेलं. या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना वेगळा विचार करण्यास भाग पडलं.
चित्रपटगृहानंतर आता ओटीटीवरही या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. यामुळेच ऋषभ शेट्टी यांनी या चित्रपटाचा प्रिक्वेल काढणार असल्याचं म्हटलं होतं. ‘कंतारा’ची निर्मिती कंपनी होंबळ फिल्म्सने याला दुजोरा दिला आहे. होम्बळ कंपनीचे संस्थापक विजय किरगंदूर यांनी नुकतंच याबद्दल स्पष्टीकरण दिलं असून ऋषभ शेट्टी या प्रिक्वेलवर काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘कांतारा २’ या प्रिक्वेलमध्ये गावकरी, राजा आणि दैव यांच्यातील नात्याची गोष्ट उलगडणार आहे. या चित्रपटात मनुष्य विरुद्ध निसर्ग यांच्यातील संघर्ष पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. म्हणजे चित्रपटाच्या कथेचा पुढचा भाग बघायला मिळणार नाही तर , उलट तिची कथा अधिक विस्ताराने मांडली जाणार आहे.
हा चित्रपट पुढच्या वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तसेच या चित्रपटातील काही दृश्ये ही पावसाळ्यातील असल्याने यंदा जूनमध्ये चित्रीकरणाला सुरुवात करण्याचा विचार असल्याचे विजय यांनी सांगितले. ‘कांतारा २’ या चित्रपटाचं बजेटही यंदा वाढवल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या प्रीक्वलमध्ये आणखी नवे आणि दिग्गज कलाकारही दिसण्याची शक्यता आहे. कांताराने जगभरात ४०० कोटींची कमाई केली. ‘कांतारा’ सुरुवातीला तो कन्नड भाषेत रिलीज झाला होता, पण प्रेक्षकांमध्ये त्याची क्रेझ पाहून तो हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम मध्येही रिलीज झाला होता.
Coming Soon Kantara 2 Bollywood Movie