इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुमच्याकडे असलेला पासपोर्ट जाऊन आता त्याजागी ई पासपोर्ट येणार आहे. अत्यंत आधुनिक आणि नाविन्यपूर्ण असा हा पासपोर्ट असणार आहे. यासंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनीच माहिती दिली आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुलभ करण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठी लवकरच ई-पासपोर्ट सेवा सुरू करणार आहे.
जयशंकर म्हणाले की, भारत लवकरच नागरिकांची ओळख चोरीपासून संरक्षण आणि डेटा सुरक्षा सक्षम करण्यासाठी ई पासपोर्ट सेवा सुरू करेल. केंद्रीय पासपोर्ट संघटनेसह परराष्ट्र मंत्रालय यांच्याकडून यासाठी प्रयत्न सुरू आहे. भारतातील नागरिकांना वेळेवर, विश्वासार्ह, सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम रीतीने पासपोर्ट आणि पासपोर्ट संबंधित सेवा प्रदान करण्याचा उद्देश यामागे आहे. पासपोर्ट सेवा दिवस २०२२ च्या निमित्ताने भारतातील आणि परदेशातील सर्व पासपोर्ट जारी करणार्या प्राधिकरणांशी ही सेवा जोडून घेतली जाईल. इथून पुढे पासपोर्ट साठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना या बदलामुळे ही प्रक्रिया अधिकाधिक सुलभ होऊ शकेल.
ते म्हणाले की, नागरिकांसाठी पासपोर्ट नियम आणि प्रक्रिया सुलभ करण्यात सरकारला यापूर्वीही यश आले आहे. पासपोर्ट वितरण इकोसिस्टम अधिक सुलभ करण्यासाठी, पोलिस पडताळणीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी मंत्रालय राज्य/केंद्रशासित प्रदेश पोलिसांसोबत सतत काम करत आहे. mPassport पोलीस अॅप आता २२ राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ८२७५ पोलीस ठाण्यांसाठी वापरला जात आहे.
Coming Soon E Passport in India Characteristics