नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड,सातपूर आणि सिन्नर पूर्णतः पॅक झाल्याने नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यास आता नाशिक ते घोटी दरम्यान जागेचा शोध सुरू आहे, तशी माहिती महाराष्ट्र ओद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर यांनी दिली आयमा इंडेक्स 2022 प्रदर्शनाच्या डिरेक्टरीचे प्रकाशन काटकर यांच्या हस्ते तसेच प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, आयमा प्रदर्शनाचे अध्यक्ष धनंजय बेळे,निखिल पांचाळ,सुदर्शन डोंगरे,राजेंद्र पानसरे,ललित बूब,गोविंद झा,योगिता आहेर,राजेंद्र कोठावदे,वरूण तलवार, जितेंद्र आहेर,प्रमोद वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
त्यावेळी मार्गदर्शन करताना काटकर बोलत होते. समृद्धी महामार्ग,मुंबई -नागपूर दरम्यान लवकरच सुरू होणारी बुलेट ट्रेन आणि नियोजित सुरत-चेन्नई महामार्ग यामुळे नाशिकला मोठे महत्व प्राप्त होणार आहे. समृद्धीचे टर्मिनल एंड नाशिकला नसले तरी समृद्धीचा फायदा नाशिकला मिळवून देण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. माळेगावची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.नाशिक जिल्ह्यात मुबलक पाणी उपलब्ध आहे त्यामुळे डेस्टिनेशन नाशिकचे स्वप्न निश्चितच साकार होईल.नाशिकला फुड हब कसे करता येईल या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचे काटकर यांनी पुढे नमूद केले.जिल्ह्यातील उद्योजकांमध्ये एकोपा निर्माण करण्याचा आणि त्यांचे प्रश्न धसास लावण्याचा आयमाचा प्रयत्न स्तुत्य आहे.नाशिकच्या उद्योग क्षेत्राला बूस्ट देण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळ आयमाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक प्रदर्शनाचे चेअरमन धनंजय बेळे यांनी केले उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी नाशिक डेस्टिनेशन ही संकल्पना दृढ करावी आणि मोठ्या गुंतवणुकीचे जास्तीतजास्त प्रकल्प नाशकात यावेत साठी औद्योगिक विकास महामंडळातर्फे शर्थीचे प्रयत्न व्हावेत.नाशिकचे बहुसंख्य लघुउद्योग आता मल्टिनॅशनल झाले आहेत.जलदगतीने विकसित होणाऱ्या शहरांत नाशिकचा जगात सोळावा आणि देशात चौथा क्रमांक लागतो.नाशकात पोटेंशियल भरपूर असल्याने येथे औद्योगिक विकासाला मोठ्याप्रमाणात चालना मिळू शकेल आणि त्यादृष्टीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पावले उचलावीत अशी अपेक्षा बेळे यांनी व्यक्त केली.प्रारंभी निखिल पांचाळ आणि ललित बूब यांच्या हस्ते काटकर आणि गवळी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास आर.एस.नाईकवाडे,विनायक मोरे, दिलीप वाघ अविनाश मराठे जयदीप अलीम चंद्वानी हर्षद बेळे जगदीश पाटील,जयंत जोगळेकर,राहुल गांगुर्डे,देवेंद्र राणे,जयंत पगार,अविनाश बोडके,हर्षद ब्राह्मणकर,गौरव धारकर,विराज गडकरी,मेघा गुप्ता,हेमंत खोंड,रवींद्र झोपे,के.एन.पाटील,मनीष रावळ,सुमीत बजाज,नितेश नारायणन,सिद्धेश रायकर,सतीश कोठारी,आदी उपस्थित होते